मातृवंदना महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्जाचे आवाहन
गर्भवती महिलांना पाच हजार रुपये साहाय्यधन
बेळगाव : गर्भवती महिलांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणाऱ्या मातृवंदना योजनेंतर्गत साहाय्यधनासाठी अर्जांचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात नोंद करावी, असे महिला व बालकल्याण खात्याने कळविले आहे. या योजनेंतर्गत गर्भवती किंवा बाळंतिणींना दोन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जातात. प्रसूती झालेल्या महिलांना सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी हे साहाय्यधन दिले जाते. यंदाच्या वर्षातील सर्व लाभार्थी महिलांना साहाय्यधन देण्यात आले आहे. शिवाय नवीन अर्जासाठी आवाहनही करण्यात आले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कुपोषित होऊन नवजात बालकांवर परिणाम होतात. त्यामुळे महिलांना सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी पाच हजार रुपये साहाय्यधन देण्यात येते. यातून महिलांना फळे आणि पौष्टिक आहार खरेदी करता यावा, हाही या योजनेचा उद्देश आहे. पूर्वी केवळ पहिल्या अपत्यालाच ही योजना लागू होती. मात्र, आता दुसऱ्या अपत्यालादेखील या योजनेंतर्गत साहाय्यधन दिले जाते. मात्र, दुसरे अपत्य मुलगी असणे आवश्यक आहे.
महत्त्वाकांक्षी योजना
प्रसूती झालेल्या महिलांना सकस आहार मिळावा, यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी नावनोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत महिलांना पौष्टिक आहार, औषधे आणि इतर खर्चासाठी हा निधी वापरता येणार आहे.
– रेवती होसमठ (जिल्हा कार्यक्रम अधिकारी)
Home महत्वाची बातमी मातृवंदना महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्जाचे आवाहन
मातृवंदना महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्जाचे आवाहन
गर्भवती महिलांना पाच हजार रुपये साहाय्यधन बेळगाव : गर्भवती महिलांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणाऱ्या मातृवंदना योजनेंतर्गत साहाय्यधनासाठी अर्जांचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात नोंद करावी, असे महिला व बालकल्याण खात्याने कळविले आहे. या योजनेंतर्गत गर्भवती किंवा बाळंतिणींना दोन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जातात. प्रसूती झालेल्या महिलांना सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी […]