सभ्य समाजात सीएएला स्थान नाही
कोणत्याही सभ्य समाजात सीएएसारख्या धर्माधारित कायद्याला स्थान नाही, असे वादग्रस्त विधान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. सीएए हा कायदा धर्मावर आधारित आहे. तो भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात चालणार नाही. या कायद्याला विरोध करण्यासाठी अनेकजण पुढे आले. पण काँग्रेसने मात्र या सीएएविरोधी आंदोलनातून काढता पाय घेतला, अशी टीका त्यांनी काँग्रेसवरही केली. केरळमध्ये येत्या शनिवारी सर्व 20 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सीएए कायदा करुन आपला हेतू स्पष्ट केला. काँग्रेसने या कायद्याला विरोध करण्याची आवश्यकता होती. तथापि, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सीएए रद्द केला जाईल असे आश्वासन नाही. यावरुन काँग्रेसचा या कायद्याला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. डाव्या आघाडीचा मात्र या कायद्याला ठाम विरोध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
Home महत्वाची बातमी सभ्य समाजात सीएएला स्थान नाही
सभ्य समाजात सीएएला स्थान नाही
कोणत्याही सभ्य समाजात सीएएसारख्या धर्माधारित कायद्याला स्थान नाही, असे वादग्रस्त विधान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. सीएए हा कायदा धर्मावर आधारित आहे. तो भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात चालणार नाही. या कायद्याला विरोध करण्यासाठी अनेकजण पुढे आले. पण काँग्रेसने मात्र या सीएएविरोधी आंदोलनातून काढता पाय घेतला, अशी टीका त्यांनी काँग्रेसवरही केली. केरळमध्ये येत्या शनिवारी सर्व […]