मराठी फलक असलेल्या दुकानांमध्येच खरेदी करा
किरण गावडे यांचे आवाहन : हुतात्मा मधु बांदेकरांना श्रद्धांजली
बेळगाव : मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी होणे काळाची गरज आहे. परंतु, आज आपल्यावर आत्मचिंतनाची वेळ येऊन ठेपली आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगावमध्ये मराठीची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे ज्या दुकानावर दुसऱ्या भाषांसोबत मराठीत फलक असेल त्याच दुकानात खरेदी करावी. यामुळे दुकानांवर मराठी फलक लावण्यासाठी व्यापाऱ्यांवर दबाव येईल, असे विचार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी मांडले. हुतात्मा मधु बांदेकर यांना कचेरी गल्ली, शहापूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी किरण गावडे यांनी मराठीच्या गळचेपीबद्दल मराठी भाषिकांना माहिती दिली. बेळगावमध्ये खरेदीसाठी येणारे जास्तीतजास्त ग्राहक हे चंदगड, गोवा या परिसरातील आहेत. त्यामुळे दुकानदारांनी मराठीत फलक लावणे गरजेचेच आहे. यामुळे सरकारवर एकप्रकारे दबाव येऊन कन्नडसक्तीचा आदेश मागे घेण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मधु बांदेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मारुती चतूर म्हणाले, मागील 68 वषर्पांसून सुरू असणाऱ्या या लढ्यामध्ये मधु बांदेकर यांचे हौतात्म्य विसरून चालणार नाही. सीमाप्रश्नासाठी कारावास भोगलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमाप्रश्नाची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात सीमाप्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बांदेकर यांनी केले. यावेळी माजी महापौर महेश नाईक, दिनेश रावळ, मनोहर हलगेकर, विजय भोसले, शिवाजी हावळाण्णाचे, विजय बांदेकर, वेदांत जांगळे, विशाल जांगळे, विनायक बांदेकर, भूषण जांगळे, सुशांत जांगळे, गोपी पाटील, नारायण पाटील यांसह शहापूर परिसरातील म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मराठी फलक असलेल्या दुकानांमध्येच खरेदी करा
मराठी फलक असलेल्या दुकानांमध्येच खरेदी करा
किरण गावडे यांचे आवाहन : हुतात्मा मधु बांदेकरांना श्रद्धांजली बेळगाव : मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी होणे काळाची गरज आहे. परंतु, आज आपल्यावर आत्मचिंतनाची वेळ येऊन ठेपली आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगावमध्ये मराठीची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे ज्या दुकानावर दुसऱ्या भाषांसोबत मराठीत फलक असेल त्याच दुकानात खरेदी करावी. यामुळे दुकानांवर मराठी फलक […]