‘इव्ही’ खरेदी करा, अनुदान मिळवा!

प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचा उपक्रम पणजी : इलेक्ट्रिक वाहन खरेदीत अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने अधिसूचित केली असून त्याची कार्यवाही आता होणार आहे. सदर वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळावे म्हणून ती योजना लागू करण्यात आली असून त्यात विविध चाकी इलेक्ट्रिक वाहनांना रु. 8 हजारपासून 1 लाखापर्यंतचे अनुदान मिळणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. […]

‘इव्ही’ खरेदी करा, अनुदान मिळवा!

प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचा उपक्रम
पणजी : इलेक्ट्रिक वाहन खरेदीत अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने अधिसूचित केली असून त्याची कार्यवाही आता होणार आहे. सदर वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळावे म्हणून ती योजना लागू करण्यात आली असून त्यात विविध चाकी इलेक्ट्रिक वाहनांना रु. 8 हजारपासून 1 लाखापर्यंतचे अनुदान मिळणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. या योजनेंतर्गत वाहनधारकास किमान 8 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार अशी खात्री देण्यात आली आहे. कमाल रक्कम वरील आकडेवारीनुसार वाढू शकते, असेही अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने उपयोगाची तसेच महत्त्वाची असून ती वाहने रस्त्यावर यावीत यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत.
अशाप्रकारे मिळणार अनुदान

दुचाकी                  रु. 8 हजार ते ऊ. 15 हजार
तीनचाकी              रु. 8 हजार ते ऊ. 60 हजार
चारचाकी              रु. 8 हजारपासून ऊ. 1 लाख