Butter Chicken Pav बटर चिकन पाव: नॉर्थ इंडियन बटर चिकनचा ‘पाव’ सोबत नवा अवतार! मुंबईतील फूड लव्हर्सची नवी आवड

मुंबई ही फूड लव्हर्सची राजधानी आहे, जिथे वडा पाव ते पाव भाजीपर्यंत सगळे स्ट्रीट फूड स्टायल्स एकत्र दिसतात. आता त्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे बटर चिकन पाव! हा म्हणजे उत्तर भारतीय बटर चिकनचा क्रिमी, मसालेदार स्वाद मुंबईच्या सॉफ्ट पावसोबत …
Butter Chicken Pav बटर चिकन पाव: नॉर्थ इंडियन बटर चिकनचा ‘पाव’ सोबत नवा अवतार! मुंबईतील फूड लव्हर्सची नवी आवड

मुंबई ही फूड लव्हर्सची राजधानी आहे, जिथे वडा पाव ते पाव भाजीपर्यंत सगळे स्ट्रीट फूड स्टायल्स एकत्र दिसतात. आता त्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे बटर चिकन पाव! हा म्हणजे उत्तर भारतीय बटर चिकनचा क्रिमी, मसालेदार स्वाद मुंबईच्या सॉफ्ट पावसोबत मिळवून देणारा फ्युजन. पण मुंबईत आता हा ग्रेव्ही पावमध्ये भरून, चीज किंवा मेयोनेस टॉप करून सर्व केला जातोय. हे फूड ट्रेंड २०२४-२५ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालं. तसेच हे मुंबईच्या चौपाटी स्टाइल फूड व्हेंडर्सकडून सुरू झालं. २०२५ मध्ये, खासकरून रमझान किंवा दिवाळीनंतर, चिकन-मटण फ्युजन डिशेसमध्ये ही जोड झाली.

बटर चिकन पाव रेसिपी
साहित्य-
बोनलेस चिकन
ग्रॅमलाडी पाव- दोन
टोमॅटो प्युरी- एक मोठा चमचा
फ्रेश क्रीम किंवा मलाई- तीन टेबलस्पून  
बटर-दोन टेबलस्पून
तेल- एक टीस्पून
कांदा बारीक चिरलेला- एक चमचा
लसूण-आले पेस्ट-एक टीस्पून
लाल मिरची पावडर-एक टीस्पून
गरम मसाला- अर्धा टीस्पून
कसुरी मेथी-एक टीस्पून
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर  
चीज-दोन टेबलस्पून

ALSO READ: Chicken Tikka झटपट तयार होणारी रेसिपी चिकन टिक्का
कृती-
सर्वात आधी चिकन मॅरिनेट करा. आता त्यात दही दोन चमचे, लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून, मीठ, लसूण-आले पेस्ट अर्धा टीस्पून घाला व चांगल्या प्रकारे मिक्स करा. कमीतकमी ५ मिनिटे ठेवा. आता  नॉन-स्टिक पॅनमध्ये एक टीस्पून तेल गरम करा. व मॅरिनेट केलेलं चिकन घाला आणि मध्यम आचेवर ४-५ मिनिटे दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत शिजवा. आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या व आता त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून बटर वितळवा. कांदा घाला व गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्या, आता टोमॅटो प्युरी घाला आणि दोन मिनिटे परतवून घ्या.लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून हलवून घ्या. तसेच आता क्रीम घाला आणि काई मिनिट मिक्स करा. तसेच शिजलेलं चिकन परत घाला व कसुरी मेथी क्रश करून टाका. आता दोन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या तसेच ग्रेव्ही थोडी घट्ट होईल. आता पाव मधून चिरा व बटर लावा. तव्यावर १ मिनिट प्रत्येक बाजू टोस्ट करा. यानंतर पाव उघडा आत ग्रेव्ही व चिकन पीस भरा. वरून चीज आणि कोथिंबीर घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबू पिळू शकतात. तयार बटर चिकन पाव नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: डिनर मध्ये बनवा स्वादिष्ट असे Black Sesame Chicken Recipe
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: स्वादिष्ट आणि आरोग्यदायी Chicken Manchow Soup रेसिपी