Satara News : प्रेमाचा दिवस मात्र… अजिंक्यताऱ्यावर ‘नो एंन्ट्री’

                           अजिंक्यतारा किल्ल्यावर कडक बंदोबस्त सातारा : प्रेमाचा दिवस १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात साजरा होत असताना याच दिवशी ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या गड किल्ल्यांवर, प्राचीन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रेमी युगुल येतात आणि प्रेमाचे चाळे अश्लील वर्तन होताना दिसल्याने बजरंग […]

Satara News : प्रेमाचा दिवस मात्र… अजिंक्यताऱ्यावर ‘नो एंन्ट्री’

                           अजिंक्यतारा किल्ल्यावर कडक बंदोबस्त
सातारा : प्रेमाचा दिवस १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात साजरा होत असताना याच दिवशी ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या गड किल्ल्यांवर, प्राचीन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रेमी युगुल येतात आणि प्रेमाचे चाळे अश्लील वर्तन होताना दिसल्याने बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी हे खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. या अनुषणगाने किल्ले अजिंक्यतारा येथे संपूर्ण दिवस युवक युवतींना पोलिसांनी नो इन्ट्री केली होती.
सातारा पोलिसांनी शनिवारी सकाळपासूनच किल्ले अजिंक्यतारा येथे जाणाऱ्या मार्गावर तसेच चारभिंती परिसरात पुरुष व महिला होमगार्ड तसेच पोलीस शिपाई यांना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये,याची दक्षता घेत अजिंक्यताराबर जाण्यास मुला मुलींना मज्जाव केला होता. चारभिंतीवर होमगार्ड पथक तैनात करण्यात आले होते. हे पथक परिसरात गस्त घालून येणाऱ्या तरुण जोडप्यांना हुसकावून लावत होते.
ही संपूर्ण कारवाई हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवत एक प्रकारे घेतलेली खबरदारी होती.