वरळीत कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वरळी (worli) इथे एका व्यावसायिकाच्या आलिशान कारने दुचाकीला धडक (accident) दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. विनोद लाड (28) असे या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कारच्या (luxury car) धडकेत कावेरी नाखवा हिचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आहे.  ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अशीच एक घटना घडली आहे. 20 जुलैला वरळी सीफेसजवळ ए जी खान अब्दुल गफार खान रोडवर कामावरून घरी जाताना विनोद यांच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने (BMW car) मागून धडक दिली. तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मागून येणाऱ्या दुसऱ्या ऑटोच्या चालकाने त्याला नायर रुग्णालयात नेले. विनोद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यांचे निधन (death) झाले. अपघातग्रस्त वाहन हे ठाण्यातील (thane) एका व्यवसायकाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरळीतील फोर सीझन हॉटेलमध्ये कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे व्यापारी वरळीत आले होते. अपघाताच्या वेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर हा कार चालवत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड यांच्या फिर्यादीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबरमध्ये होणार होते लग्न मूळचा मालवणचा रहिवासी असलेला विनोद हा ठाण्यातील एका खासगी वाहतूक कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता. लहान वयातच आई-वडील गमावल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि स्वत:च्या बळावर ही नोकरी मिळवली. विनोद हा त्याच्या चुलत भावाकडे हिल रोड येथे राहत होता. डिसेंबरमध्ये विनोदचे लग्न होणार होते. नुकतेच मंगळसूत्र आणि अंगठीही खरेदी केल्याची माहिती त्यांचे मेहुणे सूर्यकांत जाधव यांनी दिली.हेही वाचा उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या, आरोपी फरार शिळफाटा : सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात

वरळीत कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वरळी (worli) इथे एका व्यावसायिकाच्या आलिशान कारने दुचाकीला धडक (accident) दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. विनोद लाड (28) असे या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कारच्या (luxury car) धडकेत कावेरी नाखवा हिचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत आहे.  ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अशीच एक घटना घडली आहे.20 जुलैला वरळी सीफेसजवळ ए जी खान अब्दुल गफार खान रोडवर कामावरून घरी जाताना विनोद यांच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने (BMW car) मागून धडक दिली. तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मागून येणाऱ्या दुसऱ्या ऑटोच्या चालकाने त्याला नायर रुग्णालयात नेले. विनोद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यांचे निधन (death) झाले.अपघातग्रस्त वाहन हे ठाण्यातील (thane) एका व्यवसायकाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरळीतील फोर सीझन हॉटेलमध्ये कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे व्यापारी वरळीत आले होते. अपघाताच्या वेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर हा कार चालवत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड यांच्या फिर्यादीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.डिसेंबरमध्ये होणार होते लग्नमूळचा मालवणचा रहिवासी असलेला विनोद हा ठाण्यातील एका खासगी वाहतूक कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता. लहान वयातच आई-वडील गमावल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि स्वत:च्या बळावर ही नोकरी मिळवली. विनोद हा त्याच्या चुलत भावाकडे हिल रोड येथे राहत होता. डिसेंबरमध्ये विनोदचे लग्न होणार होते. नुकतेच मंगळसूत्र आणि अंगठीही खरेदी केल्याची माहिती त्यांचे मेहुणे सूर्यकांत जाधव यांनी दिली.हेही वाचाउरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या, आरोपी फरारशिळफाटा : सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात

Go to Source