भाईंदरमध्ये 58 वर्षीय वृद्ध महिलेला बसने चिरडले

मीरा-भाईंदर (mira – bhayender)मध्ये महापालिका परिवहन बसने एका महिलेला चिरडले.  गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. 58 वर्षीय महिला पतीसह बसची वाट पाहत होती. ही घटना भाईंदर (bhayender) येथील बंदरवाडी परिसरात सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.  दुर्गादेवी भिष्ट वय वर्षे 58 या आपल्या पतीसह बंदरवाडी जंक्शनवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. बसचे नियंत्रण सुटले अन् बसने दोन ऑटोरिक्षाला धडक दिली. तसेच रिक्षाला धडक दिल्यानंतर बसने पुढे जात दुर्गादेवी यांना चिरडले. दुर्गादेवी यांना दुखापत झाली. त्यांना तात्काळ नागरी रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी म्हणाले, “आम्ही बस चालकाला अटक केली असून एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या दोन ऑटोरिक्षाला धडक बसली.” या घटनेनंतर रहिवाशांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा आणि खिडक्यांचे नुकसान केले. तेव्हाच चालकाने बस थांबवून मागे घेतली, असे कोळी म्हणाले.हेही वाचा ठाण्यातील ‘या’ 6 मोठ्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार सिडको बामणडोंगरी गृहनिर्माण प्रकल्पातील दुकानांसाठी पुन्हा ई-लिलाव

भाईंदरमध्ये 58 वर्षीय वृद्ध महिलेला बसने चिरडले

मीरा-भाईंदर (mira – bhayender)मध्ये महापालिका परिवहन बसने एका महिलेला चिरडले.  गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. 58 वर्षीय महिला पतीसह बसची वाट पाहत होती. ही घटना भाईंदर (bhayender) येथील बंदरवाडी परिसरात सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. दुर्गादेवी भिष्ट वय वर्षे 58 या आपल्या पतीसह बंदरवाडी जंक्शनवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. बसचे नियंत्रण सुटले अन् बसने दोन ऑटोरिक्षाला धडक दिली. तसेच रिक्षाला धडक दिल्यानंतर बसने पुढे जात दुर्गादेवी यांना चिरडले.दुर्गादेवी यांना दुखापत झाली. त्यांना तात्काळ नागरी रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी म्हणाले, “आम्ही बस चालकाला अटक केली असून एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या दोन ऑटोरिक्षाला धडक बसली.”या घटनेनंतर रहिवाशांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा आणि खिडक्यांचे नुकसान केले. तेव्हाच चालकाने बस थांबवून मागे घेतली, असे कोळी म्हणाले.हेही वाचाठाण्यातील ‘या’ 6 मोठ्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणारसिडको बामणडोंगरी गृहनिर्माण प्रकल्पातील दुकानांसाठी पुन्हा ई-लिलाव

Go to Source