राजापूर शहरात गजबजलेल्या वस्तीत घरफोडी
राजापूर प्रतिनिधी
राजापुर शहरातील भटाळी येथे भर वस्तीत घरफोडी झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली आहे. शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडीत यांचे समर्थनगर येथील राहत्या घरी चोरी झाली आहे. अज्ञान चोरटयांनी चार ते पाच लाख किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबविले आहेत.
भर वस्तीत झालेल्या चोरीने राजापूरात एकच खळबळ उडाली आहे. या कालावधीत पंडीत घर बंद करून कळसवली येथे गेले असताना ही चोरी झाली आहे.शनिवारी सायंकाळी २.३० ते रात्रौ ९.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी विजयकुमार पंडीत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर तपासासाठी श्वानपथक दाखल झाले आहे.
Home महत्वाची बातमी राजापूर शहरात गजबजलेल्या वस्तीत घरफोडी
राजापूर शहरात गजबजलेल्या वस्तीत घरफोडी
राजापूर प्रतिनिधी राजापुर शहरातील भटाळी येथे भर वस्तीत घरफोडी झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली आहे. शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडीत यांचे समर्थनगर येथील राहत्या घरी चोरी झाली आहे. अज्ञान चोरटयांनी चार ते पाच लाख किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबविले आहेत. भर वस्तीत झालेल्या चोरीने राजापूरात एकच खळबळ उडाली आहे. या कालावधीत […]
