शांतीनगर-टिळकवाडीत घरफोडीचा प्रयत्न
संशयिताचा वावर सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. गुन्हेगारांना रोखण्यासाठी सुरू असलेले पोलीस दलाचे प्रयत्न तोकडे पडत असून सध्या निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी शांतीनगर-टिळकवाडी परिसरात घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. शांतीनगर परिसरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एक टोपीधारी चोरीसाठी घराच्या आजूबाजूला फिरून चाचपणी करतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उघडकीस आला असून घरफोडीचा प्रयत्न करणारा गुन्हेगार कोण? याचा शोध घ्यावा लागणार आहे. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे. शांतीनगर येथील एका घराच्या आजूबाजूला घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला असून या प्रयत्नात त्याला यश आले नाही. घरमालकाने फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार त्यांना कळाला. टिळकवाडी, शहापूर, उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या सुरू आहेत. एकाही प्रकरणात गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांना त्रस्त करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
Home महत्वाची बातमी शांतीनगर-टिळकवाडीत घरफोडीचा प्रयत्न
शांतीनगर-टिळकवाडीत घरफोडीचा प्रयत्न
संशयिताचा वावर सीसीटीव्हीत कैद बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. गुन्हेगारांना रोखण्यासाठी सुरू असलेले पोलीस दलाचे प्रयत्न तोकडे पडत असून सध्या निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी शांतीनगर-टिळकवाडी परिसरात घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. शांतीनगर परिसरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एक टोपीधारी चोरीसाठी घराच्या आजूबाजूला […]