सांबरा येथे घरफोडी; 6 तोळ्यांचे दागिने लंपास
वायुदलातील जवानाच्या बंद घरावर डल्ला
वार्ताहर /सांबरा
महादेवनगर सांबरा येथील बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. श्रीहर्ष कोन्नूर हे आपल्या आईसोबत महादेवनगर येथे राहतात. श्रीहर्ष कोन्नूर हे सध्या आसाम-गुवाहाटी येथे वायुदलामध्ये सेवा बजावत आहेत. त्यांची आई शांतादेवी कोन्नूर या चार दिवसांपूर्वी आपल्या मुलीकडे विजापूरला गेल्या होत्या. गुरुवारी दुपारी विजापूरहून आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लागलीच याबाबतची माहिती मारीहाळ पोलिसांना देण्यात आली. मारीहाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा काही सुगावा लागला नाही.
चोरट्यांनी समोरील दरवाजाचा कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिजोरीतील साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते. चोरट्यांना तिजोरीमध्ये काहीच न मिळाल्याने त्यांनी हॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या ट्रंकाचे कुलूप तोडून ट्रंकमधील अडीच तोळ्याची सोन्याची चेन, साडेतीन तोळ्याचे गंठण व चार हजार रुपये रोख रक्कम लांबविली आहे. जाताना परसातील दरवाजा काढून पसार झाले आहेत. मागील दोन-तीन दिवसांमध्येच हा चोरीचा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच असून याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे बंद घरांना लक्ष्य बनवत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Home महत्वाची बातमी सांबरा येथे घरफोडी; 6 तोळ्यांचे दागिने लंपास
सांबरा येथे घरफोडी; 6 तोळ्यांचे दागिने लंपास
वायुदलातील जवानाच्या बंद घरावर डल्ला वार्ताहर /सांबरा महादेवनगर सांबरा येथील बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. श्रीहर्ष कोन्नूर हे आपल्या आईसोबत महादेवनगर येथे राहतात. श्रीहर्ष कोन्नूर हे सध्या आसाम-गुवाहाटी येथे वायुदलामध्ये सेवा […]