नाझर कॅम्प येथे पुन्हा घरफोडी
प्रतिनिधी/ बेळगाव
तुम्ही कितीही गस्त घाला, आम्हाला कितीही पकडण्याचा प्रयत्न करा, तरी आम्ही चोरी करणारच… असे जणू आव्हानच चोरट्यांनी वडगाव परिसरातील जनतेला दिले आहे. पोलिसांबरोबरच तरुणही गस्त घालत आहेत. मात्र चोरट्यांच्या मनात किंचितही भीती नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. पाचवा क्रॉस, नाझरकॅम्प-वडगाव येथील नवीन घर चोरट्यांनी लक्ष्य केले. समोरचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मात्र काहीच नसल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला आहे.
शुक्रवारी रात्री नाझरकॅम्प वडगाव येथे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. नवीन घराला मालकाने समोरील दरवाजा बंद करून पाठीमागच्या दरवाजाला कुलूप लावला होता. नवीन घर असल्याने यामध्ये निश्चितच काही तरी मिळेल, या आशेने चोरट्यांनी समोरील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मात्र आतमध्ये काहीच सापडले नाही. नवीन घर बांधण्यात आले आहे. मात्र याचा मालक इतरत्र राहत आहे. घरात काही नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
सध्या आनंदनगर परिसरात घरफोडीची मालिकाच सुरू आहे. अक्षरश: चोरट्यांनी थैमान घातले आहे. जणू एक आव्हानच साऱ्यांसमोर उभे केले आहे. पोलीस सतर्क झाले आहेत. याचबरोबर आनंदनगर, केशवनगर परिसरातील तरुण रात्रीच्यावेळी गस्त घालत आहेत. असे असताना चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता नेमके करायचे काय? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. गेल्या 15 दिवसांपासून चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही चोरीचे सत्र सुरूच
आनंदनगर, केशवनगर, साई कॉलनी, अनगोळ येथील कनकदास कॉलनी, नाझरकॅम्प येथे चोरीची मालिका सुरूच आहे. याचबरोबर चोरट्यांनी ग्रामीण भागालाही लक्ष्य बनविले आहे. मंगळवार दि. 19 रोजी भरदिवसा घर फोडून रोख रक्कम लांबविली आहे. त्यानंतर शुक्रवार दि. 22 रोजी सांबरा येथेही घरफोडी करून सहा तोळ्यांचे दागिने लांबविले आहेत. चोरट्यांनी शहराबरोबरच ग्रामीण भागातही चोरीचा उच्छाद मांडला आहे. पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच उभे केले आहे………………………..
Home महत्वाची बातमी नाझर कॅम्प येथे पुन्हा घरफोडी
नाझर कॅम्प येथे पुन्हा घरफोडी
प्रतिनिधी/ बेळगाव तुम्ही कितीही गस्त घाला, आम्हाला कितीही पकडण्याचा प्रयत्न करा, तरी आम्ही चोरी करणारच… असे जणू आव्हानच चोरट्यांनी वडगाव परिसरातील जनतेला दिले आहे. पोलिसांबरोबरच तरुणही गस्त घालत आहेत. मात्र चोरट्यांच्या मनात किंचितही भीती नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. पाचवा क्रॉस, नाझरकॅम्प-वडगाव येथील नवीन घर चोरट्यांनी लक्ष्य केले. समोरचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मात्र […]