बुमराह आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १०० बळी घेणारा दुसरा भारतीय ठरला

अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आणि एक मोठा टप्पा गाठला. बुमराह टी२० सामन्यांमध्ये १००+ बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

बुमराह आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १०० बळी घेणारा दुसरा भारतीय ठरला

अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आणि एक मोठा टप्पा गाठला. बुमराह टी२० सामन्यांमध्ये १००+ बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात एक मोठा टप्पा गाठला. बुमराह भारताकडून टी२० सामन्यांमध्ये १००+ बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने या बाबतीत अर्शदीप सिंगची बरोबरी केली आहे. आतापर्यंत फक्त बुमराह आणि अर्शदीप यांनीच सर्वात लहान स्वरूपात भारताकडून १००+ बळी घेतले आहे.

बुमराह टी२० सामन्यांमध्ये १०० बळी घेण्यापासून एक पाऊल दूर होता. बुमराहने टी२० सामन्यांमध्ये त्याचा १०० वा बळी असलेल्या देवाल्ड ब्रेव्हिसला बाद केले. त्यानंतर त्याने त्याच षटकात केशव महाराजला बाद केले. बुमराहने आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०१ बळी घेतले आहे, ज्यामुळे तो या फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. भारतासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अर्शदीपच्या नावावर आहे, त्याने ६९ सामन्यांमध्ये १०७ बळी घेतले आहेत. हार्दिक पंड्या ९९ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकला १०० बळी गाठण्याची संधी आहे आणि तो ती गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

तसेच बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १००+ बळी घेणारा पहिला भारतीय आणि एकूण पाचवा गोलंदाज आहे. त्याच्या आधी लसिथ मलिंगा, टिम साउदी, शकिब अल हसन आणि शाहीन आफ्रिदी आहे. बुमराहने आतापर्यंत कसोटीत २३४ बळी घेतले आहे, तर एकदिवसीय सामन्यात त्याच्याकडे १४९ बळी आहे.

उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीमुळे भारताने कटकमधील पहिल्या टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारताने मोठा विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

ALSO READ: IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मंधाना सह दोन नवीन चेहऱ्यांना संधी
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: IPL 2026 Auction: 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, फक्त दोन भारतीयांची मूळ किंमत 2 कोटी रुपये