मुंबई, ठाणे, नवी मुंबई पालिकेकडून बंपर बोनस जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 31 हजार रुपये सानुग्रह अनुदान महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी गुरुवारी जाहीर केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 3 हजार रुपये वाढीव बोनस (bonus) देण्यात आला आहे. मुंबई (mumbai) महापालिकेच्या (bmc) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 31 हजार रुपये, नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 34 हजार 500 रुपये आणि ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 24 हजार 500 रुपये बोनस मिळणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. मुंबई महापालिकेप्रमाणे ‘बेस्ट’ कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही 31 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (thane) महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारा निर्णय जाहीर करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ही रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश संबंधित महापालिका आयुक्तांना गुरुवारी दिले. यंदा मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस मिळणार आहे. त्यांना 2023 मध्ये 26 हजार रुपये तर, 2024 मध्ये 29 हजार बोनस जाहीर झाला होता. या बोनसमुळे मुंबई महापालिकेवर 285 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.हेही वाचा माहीम सी फूड प्लाझा पुन्हा सुरू एमएमआरसी आणि सिटीफ्लोचे नवीन बस मार्ग सुरू

मुंबई, ठाणे, नवी मुंबई पालिकेकडून बंपर बोनस जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 31 हजार रुपये सानुग्रह अनुदान महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी गुरुवारी जाहीर केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 3 हजार रुपये वाढीव बोनस (bonus) देण्यात आला आहे. मुंबई (mumbai) महापालिकेच्या (bmc) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 31 हजार रुपये, नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 34 हजार 500 रुपये आणि ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 24 हजार 500 रुपये बोनस मिळणार आहे.याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. मुंबई महापालिकेप्रमाणे ‘बेस्ट’ कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही 31 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे.मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (thane) महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारा निर्णय जाहीर करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ही रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश संबंधित महापालिका आयुक्तांना गुरुवारी दिले. यंदा मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस मिळणार आहे. त्यांना 2023 मध्ये 26 हजार रुपये तर, 2024 मध्ये 29 हजार बोनस जाहीर झाला होता. या बोनसमुळे मुंबई महापालिकेवर 285 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.हेही वाचामाहीम सी फूड प्लाझा पुन्हा सुरूएमएमआरसी आणि सिटीफ्लोचे नवीन बस मार्ग सुरू

Go to Source