Budget 2024: इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये काय बदल झालेत? कुणाला किती कर भरावा लागणार?

निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषण करतात तेव्हा सर्वांचं लक्ष भाषणाच्या दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणाऱ्या आयकर प्रणालीतील बदलांकडे असतं.

यावेळी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर प्रणालीत दोन महत्त्वाचे बदल केलेले आहेत. ते कोणते हे पाहुयात.

जुलै 2024 पासूनचे नवीन आयकर प्रणालीत बदल

या ‘न्यू टॅक्स रेजीम’ म्हणजे नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजे वैयक्तिक करदाते, सिनीअर सिटीझन्स – ज्येष्ठ नागरिक, सुपर सिनियर सिटीझन्स – अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी एकच कररचना आहे.

या न्यू टॅक्स रेजीममध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही.

3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध)

7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध)

10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर लागतो.

12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर लागतो.

15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो.

फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर केलेली नवीन कररचना

फेब्रुवारी 2024मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा त्यांनी अशी कर प्रणाली जाहीर केली होती.

या न्यू टॅक्स रेजीममध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही.

3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध)

6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध)

9 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर लागतो.

12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर लागतो.

15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो.

जुनी कर प्रणाली

जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ती खालीलप्रमाणे असणार आहे. ही प्रणाली 2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर सर्व करदात्यांनी नवीन कर प्रणालीप्रमाणे कर भरावा लागणार आहे.

जुन्या कर प्रणालीमध्ये 60 वर्षांवरील पण 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिंकांचं 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.

तर 80 वर्षांवरील अति ज्येष्ठांचं 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.

इतरांसाठीची कर संरचना

2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% आयकर

5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आयकर आकारला जातो.

10 लाखांवरील उत्पन्नावर जुन्या कर प्रणालीनुसार 30% आयकर आकारला जातो.

Published By- Priya Dixit 

Go to Source