न्यायालयाच्या आदेशानुसार बुडाने जमिनी परत कराव्यात

कणबर्गी येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन बेळगाव : कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी बुडाकडून 2007 मध्ये संपादीत केल्या होत्या. या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिला असून, सदर जमिनी परत कराव्यात, अशा मागणीचे निवेदन कणबर्गी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बुडाकडून योजना क्रमांक 61 राबविताना कणबर्गी येथील शेतकऱ्यांना […]

न्यायालयाच्या आदेशानुसार बुडाने जमिनी परत कराव्यात

कणबर्गी येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन
बेळगाव : कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी बुडाकडून 2007 मध्ये संपादीत केल्या होत्या. या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिला असून, सदर जमिनी परत कराव्यात, अशा मागणीचे निवेदन कणबर्गी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बुडाकडून योजना क्रमांक 61 राबविताना कणबर्गी येथील शेतकऱ्यांना जमीन संपादनासाठी नोटीस दिली होती. पिकाऊ जमीन असल्याने शेतकऱ्यांनी सदर जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. असे असले तरी बुडाकडून जमीन संपादन करण्यास पुढाकार घेण्यात आला होता. यावरुन शेतकऱ्यांनी धारवाड उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत जमिनी संपादन करण्यास बुडाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने न्याय दिला आहे. त्यामुळे संपादन करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना त्या जमिनी परत कराव्यात, अशी मागणी करत कणबर्गी येथील शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शेतकऱ्यांना न्याय द्या
योजना क्रमांक 61 साठी संपादीत करण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकमधील जमिनी शेतकऱ्यांच्या परत देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकरी बबन मालाई, भावकाण्णा मालाई, बी. एम. मालाई आदी शेतकरी उपस्थित होते.