बीएससी, युनियन जिमखानाची विजयी सलामी

करडी चषक क्रिकेट स्पर्धा बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी बेळगाव स्पोर्टस क्लबने निना स्पोर्टसचा 6 गड्यांनी तर युनियन जिमखानाने दुर्गा स्पोर्टसचा 7 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. अवनीश बसुर्तेकर, अतिथ भोगन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. महावीर स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वीरेशगौडर, माजीद […]

बीएससी, युनियन जिमखानाची विजयी सलामी

करडी चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी बेळगाव स्पोर्टस क्लबने निना स्पोर्टसचा 6 गड्यांनी तर युनियन जिमखानाने दुर्गा स्पोर्टसचा 7 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. अवनीश बसुर्तेकर, अतिथ भोगन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. महावीर स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वीरेशगौडर, माजीद मकानदार, सोमनाथ सोमण्णाचे, आनंद करडी, चंद्रशेखर पुरद यांच्या हस्ते यष्टीचे पुजन करून करण्यात आले. पहिल्या सामन्यात निना स्पोर्टस प्रथम फलंदाजी करताना 23. 4 षटकात सर्व गडी बाद 78 धावा केले. त्यात हर्ष जाधवने 3 चौकारासह 27, समर्थ चौगुले 3 चौकारासह 14, धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस क्लबतर्फे प्रथम अवनीश बसुर्तेकरने 6 धावात 5, रजत उघाडेने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्टस क्लबने 21. 4 षटकात 4 गडी बाद 82 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात केदार संभाजीने 1 षटकार 3 चौकारासह 33, सचिनने 20 धावा केल्या. निनातर्फे जियानने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात दुर्गा स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 91 धावा केल्या. त्यात पृथ्वीराज शिंदेने 20, प्रणवने 17 धावा केल्या. जिमखानातर्फे अतिथ भोगनने 18 धावा तर वीर मिर्जीने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 14.5 षटकात 3 गडीबाद 92 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अवदुंभर व अनिश यांनी प्रत्येकी 4 चौकारासह 20 धावा केल्या. दुर्गातर्फे श्रेयसने 2 गडी बाद केले.

Go to Source