एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या, शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील शिवतरगंज भागात एकाच कुटुंबियातील चौघांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या, शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील शिवतरगंज भागात एकाच कुटुंबियातील चौघांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कुटुंब प्रमुख एका सरकारी शाळेत शिक्षक असून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहायचे.अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांची आवाज ऐकून शेजारचे लोक त्यांच्या घराकडे धावत गेले असता हल्लेखोर फरार झाले.हल्लेखोरांनी घरच्या कोणत्याही सामानाला हात लावला नाही.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 

चोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मयत महिलेच्या पोटातून 2 गोळ्या सापडल्या आहे. मयतच्या शरीरातून एक गोळी सापडली आहे तर दोन्ही मुलींच्या शरीरातून प्रत्येकी एक एक गोळी सापडली आहे. आरोपींचा शोध पोलीस करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी मयताच्या पत्नीने रायबरेली ठाण्यात चंदन वर्मा नावाच्या व्यक्तीच्या विरुद्ध विनयभंग आणि एससी एसटी  कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीचा प्रकरणाशी काही संबंध आहे का पोलीस याचा शोध घेत आहे. 

मयतचे वडील म्हणाले, मी मजुरीचे काम करतो. घरी जाताना मुलाची, सुनेची आणि नातींच्या मृत्यूची बातमी मिळाली. या हत्याकांडावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. या प्रकरणावरून राज्यात राजकारण सुरु झाले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source