जन्मदात्या पित्याकडून मुलाची निर्घृण हत्या
नागपूर शहरातील 30 किमी अंतर असलेल्या पिपरा गावात फोन वर मोठ्याने बोलण्याच्या वादातून दारूच्या नशेत मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामराव काकडे असे या आरोपी पिताचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुरज असे मयत तरुणाचे नाव आहे. काकडे यांचा मुलाचे फोनवर मोठ्याने बोलण्यावरून वाद झाले रागाच्या भरात येऊन काकडे यांनी सुरजच्या डोक्यात लोखंडी रॉड ने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ते दोघे दारूच्या नशेत होते. पोलिसांनी आरोपी रामराव काकडेच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Edited by – Priya Dixit