20 ते 45 वयोगटातील पुरुष आणि महिलांना ब्राऊन शुगरचे व्यसन
तरुणांमध्ये एकीकडे मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन वाढत चालले असतानाच ब्राऊन शुगरसारख्या (brown sugar) त्यांच्यावरील अमली पदार्थांचा विळखाही पूर्वीइतकाच घट्ट असल्याचे दिसून आले आहे. 20 ते 45 वयोगटांतील स्त्रीपुरुषांमध्ये हे व्यसन धीम्यागतीने वाढत आहे.एमडी, कोकेन, चरस, हुंगून नशा करण्यासारखी काही औषधे, सिगारेट, तंबाखू, दारू, गुटख्यासह ‘ब्राऊन शुगर’चा विळखाही कायम असल्याचे रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी, समुपदेशनासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येवरून आढळले आहे. महापालिकेच्या (bmc) अंधेरी, भरडवाडी येथील सार्वजनिक आरोग्यविभागांतर्गत येणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यासाठी 1992 पासून वैद्यकीय उपचार दिले जातात. व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेविरोधात नाही तर त्याचे समुपदेशन केल्यानंतर, त्याची तयारी असेल तरच वैद्यकीय उपचार सुरू केले जातात. सध्या पुरुष रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची सुविधा आहे. महिलांना ओपीडी स्वरूपाची सेवा दिली जाते. तंबाखू दारू, गुटखा, ब्राऊन शुगर, झोपेची औषधे, चरस, गांजा अशा विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता देण्यासाठी येथे वैद्यकीय उपचार दिले जातात.या केंद्रात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी प्रत्येक वर्षी सरासरी 250 रुग्णांना दाखल केले जाते. ओपीडीमध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनमुक्तीसाठी रोज येणाऱ्या रुग्णांची संख्या 150 ते 160 आहे. वैद्यकीय देखरेखीखाली औषधांची ठराविक मात्रा घेऊन या व्यक्ती दैनंदिन कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना सारखी नशेची तलफ येत नाही. भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती उपक्रमांतर्गत येथे औषधे दिली जातात.व्यसन (addiction) हा एक मानसिक आजार आहे. त्यासाठी समुपदेशनासह औषधोपचारांचीही गरज भासते. सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, मेंदूमध्ये होणारी प्रक्रिया, व्यसनाची सहज होणारी उपलब्धता अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. हा आजार असल्याने त्या व्यक्तीला दूषणे देण्यापेक्षा त्याला मदत करणे, आजारावर उपचार घेणे अधिक गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात. औषधे वैद्यकीय निरीक्षणाखाली दिली जातात. व्यसनमुक्ती होत असताना त्यांची मात्राही कमी केली जाते. या औषधांची सवय लागत नाही, असेही तज्ज्ञ सांगतात.अनेक रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळण्याच्या अवस्थेतून जातात. त्यामुळे समुपदेशनाला विशेष महत्त्व दिले जाते. ‘अल्कोहोलिक्स या टप्प्यावर अनॉनिमस’ सारख्या गटाची मदत घेतली जाते. त्यात व्यसनमुक्त झालेल्या व्यक्ती इतरांनाही आपले अनुभव सांगतात. अशा मदतकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज समुपदेशक आर. एम. मोरे व्यक्त करतात.केवळ मुंबईतून (mumbai) नाही तर कोल्हापूर, सोलापूर, कोकण आणि कर्नाटकमधूनही रुग्ण या केंद्रात उपचारासाठी येतात. या रुग्णांची वयोमर्यादा 25 ते 40 असून अनेक रुग्ण हे गरीब वर्गातील आहेत. मुंबई उपनगरांतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. एमडी, कोकेनसारख्या महागड्या व्यसनांपेक्षा ‘ब्राऊन शुगर’ सारख्या तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या अमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात.व्यसनमुक्ती केंद्राची वैशिष्ट्ये येथे कोणत्याही रुग्णाला औषधे घेण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. नशेत असताना उपचार देऊन फायदा होत नाही. त्यांची मानसिक तयारी झाल्यानंतर त्यांना औषधोपचार सुरू केले जातात. रुग्ण जेव्हा व्यसन करणे थांबवतो, तेव्हा त्याला काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे दूर करण्यासाठी त्याला २१ दिवस रुग्णालयात दाखल करून औषधोपचार दिले जातात.हेही वाचामुंबई-अलिबाग मार्गावर 15 इलेक्ट्रिक फेरी सेवा सुरू40 हजार पोलिसांना पोलिसिंंग तंत्राचे प्रशिक्षण मिळणार
Home महत्वाची बातमी 20 ते 45 वयोगटातील पुरुष आणि महिलांना ब्राऊन शुगरचे व्यसन
20 ते 45 वयोगटातील पुरुष आणि महिलांना ब्राऊन शुगरचे व्यसन
तरुणांमध्ये एकीकडे मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन वाढत चालले असतानाच ब्राऊन शुगरसारख्या (brown sugar) त्यांच्यावरील अमली पदार्थांचा विळखाही पूर्वीइतकाच घट्ट असल्याचे दिसून आले आहे. 20 ते 45 वयोगटांतील स्त्रीपुरुषांमध्ये हे व्यसन धीम्यागतीने वाढत आहे.
एमडी, कोकेन, चरस, हुंगून नशा करण्यासारखी काही औषधे, सिगारेट, तंबाखू, दारू, गुटख्यासह ‘ब्राऊन शुगर’चा विळखाही कायम असल्याचे रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी, समुपदेशनासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येवरून आढळले आहे.
महापालिकेच्या (bmc) अंधेरी, भरडवाडी येथील सार्वजनिक आरोग्यविभागांतर्गत येणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यासाठी 1992 पासून वैद्यकीय उपचार दिले जातात. व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेविरोधात नाही तर त्याचे समुपदेशन केल्यानंतर, त्याची तयारी असेल तरच वैद्यकीय उपचार सुरू केले जातात.
सध्या पुरुष रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची सुविधा आहे. महिलांना ओपीडी स्वरूपाची सेवा दिली जाते. तंबाखू दारू, गुटखा, ब्राऊन शुगर, झोपेची औषधे, चरस, गांजा अशा विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता देण्यासाठी येथे वैद्यकीय उपचार दिले जातात.
या केंद्रात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी प्रत्येक वर्षी सरासरी 250 रुग्णांना दाखल केले जाते. ओपीडीमध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनमुक्तीसाठी रोज येणाऱ्या रुग्णांची संख्या 150 ते 160 आहे.
वैद्यकीय देखरेखीखाली औषधांची ठराविक मात्रा घेऊन या व्यक्ती दैनंदिन कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना सारखी नशेची तलफ येत नाही. भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती उपक्रमांतर्गत येथे औषधे दिली जातात.
व्यसन (addiction) हा एक मानसिक आजार आहे. त्यासाठी समुपदेशनासह औषधोपचारांचीही गरज भासते. सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, मेंदूमध्ये होणारी प्रक्रिया, व्यसनाची सहज होणारी उपलब्धता अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात.
हा आजार असल्याने त्या व्यक्तीला दूषणे देण्यापेक्षा त्याला मदत करणे, आजारावर उपचार घेणे अधिक गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात. औषधे वैद्यकीय निरीक्षणाखाली दिली जातात. व्यसनमुक्ती होत असताना त्यांची मात्राही कमी केली जाते. या औषधांची सवय लागत नाही, असेही तज्ज्ञ सांगतात.
अनेक रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळण्याच्या अवस्थेतून जातात. त्यामुळे समुपदेशनाला विशेष महत्त्व दिले जाते. ‘अल्कोहोलिक्स या टप्प्यावर अनॉनिमस’ सारख्या गटाची मदत घेतली जाते. त्यात व्यसनमुक्त झालेल्या व्यक्ती इतरांनाही आपले अनुभव सांगतात. अशा मदतकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज समुपदेशक आर. एम. मोरे व्यक्त करतात.
केवळ मुंबईतून (mumbai) नाही तर कोल्हापूर, सोलापूर, कोकण आणि कर्नाटकमधूनही रुग्ण या केंद्रात उपचारासाठी येतात. या रुग्णांची वयोमर्यादा 25 ते 40 असून अनेक रुग्ण हे गरीब वर्गातील आहेत.
मुंबई उपनगरांतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. एमडी, कोकेनसारख्या महागड्या व्यसनांपेक्षा ‘ब्राऊन शुगर’ सारख्या तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या अमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात.
व्यसनमुक्ती केंद्राची वैशिष्ट्ये येथे कोणत्याही रुग्णाला औषधे घेण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. नशेत असताना उपचार देऊन फायदा होत नाही. त्यांची मानसिक तयारी झाल्यानंतर त्यांना औषधोपचार सुरू केले जातात.
रुग्ण जेव्हा व्यसन करणे थांबवतो, तेव्हा त्याला काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे दूर करण्यासाठी त्याला २१ दिवस रुग्णालयात दाखल करून औषधोपचार दिले जातात.हेही वाचा
मुंबई-अलिबाग मार्गावर 15 इलेक्ट्रिक फेरी सेवा सुरू
40 हजार पोलिसांना पोलिसिंंग तंत्राचे प्रशिक्षण मिळणार