ललिता गावसला कांस्यपदक

बेळगाव : दिल्ली येथे आयजी स्टेडियमवर झालेल्या खेलो इंडिया प्यारा क्रीडा महोत्सवात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ललिता गावस यांना टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्ली येथे आयजी स्टेडियमवर झालेल्या खेलो इंडिया प्यारा क्रीडा स्पर्धेत ललिता गावसने उप-उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या प्रियांका वाजपेयी हिचा 3-2 अशा सेटने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात तिने […]

ललिता गावसला कांस्यपदक

बेळगाव : दिल्ली येथे आयजी स्टेडियमवर झालेल्या खेलो इंडिया प्यारा क्रीडा महोत्सवात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ललिता गावस यांना टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्ली येथे आयजी स्टेडियमवर झालेल्या खेलो इंडिया प्यारा क्रीडा स्पर्धेत ललिता गावसने उप-उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या प्रियांका वाजपेयी हिचा 3-2 अशा सेटने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात तिने गोव्याच्या अनुपा पिळगावकर हीचा 3-1 अशा सेटने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत मात्र ललिताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलेल्या गुजरातच्या भाविना पटेल हीच्याकडून 3-0 अशी हार पत्करावी लागली आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ललिता गावस बैलूर गावाची रहिवासी असून ती एक उत्तम व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू सुध्दा आहे. तिने भारतासाठी आंतररष्ट्रीय सामना ही खेळला आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Go to Source