सरिता कुमारीला ट्रॅक सायकलिंगमध्ये कांस्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये आपली गुणवत्ता दाखवून देताना भारताच्या सरिता कुमारीने कनिष्ठ महिलांच्या गटात कांस्यपदक मिळविले. तिने 36.966 से. अवधी नोंदवत हे यश मिळविले.
भारताच्या पॅरा विभागातही दोन सुवर्ण व एक रौप्य मिळविले आहे. मात्र सरिता कुमारीची कांस्यपदकाची कामगिरी लक्षवेधी ठरली. पात्रता फेरीत सरिताने दृढनिर्धारी प्रदर्शन करीत 36.912 सेकंदाची वेळ नोंदवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. ‘कनिष्ठ महिलांच्या विभागात कांस्य जिंकता आल्याने खूप समाधान व आनंदाची भावना आहे. इथपर्यंतच्या प्रवासात कठोर परिश्रम, समर्पण वृत्ती आणि प्रशिक्षक व संघसहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळविता आले,’ अशा भावना सरिताने व्यक्त केल्या. ‘माझ्यावर विश्वास दाखविलेल्या व पाठिंबा दिलेल्या सर्वांचेच हे यश आहे’, असेही ती म्हणाली.
महिलांच्या वरिष्ठ विभागातील वैयक्तिक परस्यूटमध्ये मीनाक्षीने 3:42.515 से. वेळेचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. मात्र पात्रता फेरीत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅरा ट्रॅक सायकलिंगमध्ये अर्शद शेखने दुसरे सुवर्ण पटकावताना 1 किमी टाईम ट्रायल सी 2 विभागात 1:25.753 से. वेळ नोंदवली. आर्यवर्धन चीलमपल्लीने 1:41.071 से. वेळ नोंदवत रौप्यपदक मिळविले. पॅरा महिला सायकलपटू ज्योती गडेरियाने 500 मी. टाईम ट्रायल सी 2 विभागात 52.450 से. अवधी नोंदवत सुवर्ण पटकावले.
Home महत्वाची बातमी सरिता कुमारीला ट्रॅक सायकलिंगमध्ये कांस्य
सरिता कुमारीला ट्रॅक सायकलिंगमध्ये कांस्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये आपली गुणवत्ता दाखवून देताना भारताच्या सरिता कुमारीने कनिष्ठ महिलांच्या गटात कांस्यपदक मिळविले. तिने 36.966 से. अवधी नोंदवत हे यश मिळविले. भारताच्या पॅरा विभागातही दोन सुवर्ण व एक रौप्य मिळविले आहे. मात्र सरिता कुमारीची कांस्यपदकाची कामगिरी लक्षवेधी ठरली. पात्रता फेरीत सरिताने दृढनिर्धारी प्रदर्शन करीत 36.912 सेकंदाची […]