जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या वेद मळीकची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धा ; दोन डावात 9 विकेट घेऊनसिंधुदुर्गच्या विजयात महत्त्वाचा वाटा सावंतवाडी । प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे औरंगाबाद येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग विरुद्ध क्रीकप्लस पुणे यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात सिंधुदुर्गचा वेद शिवदास मळीक याने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे .त्याने दोन डावात पुणे संघाच्या तब्बल नऊ विकेट […]

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या वेद मळीकची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धा ; दोन डावात 9 विकेट घेऊनसिंधुदुर्गच्या विजयात महत्त्वाचा वाटा
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे औरंगाबाद येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग विरुद्ध क्रीकप्लस पुणे यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात सिंधुदुर्गचा वेद शिवदास मळीक याने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे .त्याने दोन डावात पुणे संघाच्या तब्बल नऊ विकेट घेऊन सिंधुदुर्गच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. वेद शिवदास मुळीक हा इन्सुली येथील एस. आर. आय क्रिकेट अकादमीचा खेळाडू असून त्याचे प्रशिक्षक भारत गरुडकर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेद जलदगती गोलंदाजी करत आहे. औरंगाबाद येथे सिंधुदुर्ग आणि क्रिक्सप्लस पुणे यांच्यात पहिला सामना झाला. त्यात सिंधुदुर्गने पहिल्या डावात दहा गडी गमावून 251 धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल खेळताना पुणेचा संघ 112 धावात आटोपला. पुणे संघाला सिंधुदुर्ग संघाने 139 धावांचे फॉलोऑन दिले . पुणे संघाने दुसऱ्या डावात पुणे क्रिक प्लस दहा गडी गमावून केवळ 89 धावा करू शकला .सिंधुदुर्ग जिल्ह्याने हा सामना एक डाव आणि 50 धावांनी जिंकला .यात वेद शिवदास मळीक याने पहिल्या डावात 16 षटकांमध्ये 29 धावा देऊन ७ गडी पुण्याचे टिपले तर दुसऱ्या डावात ८ षटकात २० धावा देऊन पुण्याचे दोन गडी टिपले. दोन्ही डावात त्याने ९ गडी पुण्याचे टिपून सिंधुदुर्गच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. दोन्ही डावात वेद याने सहा षटके निर्धाव टाकली. वेद याचे प्रशिक्षक भारत गरुडकर यांनी अभिनंदन केले आहे. वेद याच्या रूपाने भविष्यात भारतीय संघाला जलदगती गोलंदाज मिळणार आहे. वेद उभा बाजार येथील रहिवासी आहे.