Sangli : कामेरीतील प्रज्ज्वल ठिबक दुकान आगीत खाक

                        रात्री उशिरा आग ; लाखो रुपयांचे नुकसान ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील कामेरी येथील प्रकाश मोरे यांच्या प्रज्ज्वल ठिबक या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. ही आग शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. मोरे यांचे […]

Sangli : कामेरीतील प्रज्ज्वल ठिबक दुकान आगीत खाक

                        रात्री उशिरा आग ; लाखो रुपयांचे नुकसान

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील कामेरी येथील प्रकाश मोरे यांच्या प्रज्ज्वल ठिबक या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. ही आग शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मोरे यांचे कामेरी गावच्या पश्चिमेला प्रज्ज्वल ठिबक नावाचे दुकान आहे. यामध्ये पीव्हीसी पाईपसह अन्य शेतीपयोगी साहित्य होते. शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीने काही वेळात रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ व धुराचे लोट यामुळे घबराट निर्माण झाला. दरम्यान लोकांनी ईश्वरपूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावून घेतला.
पण आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यामुळे हे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री उशिरा ईश्वरपूर पोलीस घटनास्थळी पोहचले.