कलाश्री उद्योग समूहातर्फे वधू-वर, पालक मेळावा
बेळगाव : कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर उद्योग समूह व लक्ष्मीनारायण वधू-वर सूचक केंद्राचा मेळावा नुकताच कलाश्री टॉवर येथे पार पडला. अध्यक्षस्थानी कलाश्री समूहाचे संस्थापक प्रकाश डोळेकर होते. प्रास्ताविकात वाय. बी. पोवार म्हणाले, लग्नकार्य थोडक्यात निभावावीत, गवंडी, पेंटर, फरशी फिटर आदी कामगारवर्गांना मुली दिल्या जात नाहीत, याची त्यांनी खंत व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक शंकर मासेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डी. बी. पाटील यांनी मधुमेह, मूळव्याध याविषयी माहिती दिली. यावेळी 45 हून अधिक पालक व वधू-वरांनी नावनोंदणी केली. यावेळी वधू-वर केंद्राचे प्रमुख अण्णू कदम, श्रीकांत भोसले, दत्ता सोमसाळे, विद्या कणबरकर, वाळवेकर, पी. वाय. लोहार, जुवेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुकन्या डोळेकर यांनी केले.
Home महत्वाची बातमी कलाश्री उद्योग समूहातर्फे वधू-वर, पालक मेळावा
कलाश्री उद्योग समूहातर्फे वधू-वर, पालक मेळावा
बेळगाव : कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर उद्योग समूह व लक्ष्मीनारायण वधू-वर सूचक केंद्राचा मेळावा नुकताच कलाश्री टॉवर येथे पार पडला. अध्यक्षस्थानी कलाश्री समूहाचे संस्थापक प्रकाश डोळेकर होते. प्रास्ताविकात वाय. बी. पोवार म्हणाले, लग्नकार्य थोडक्यात निभावावीत, गवंडी, पेंटर, फरशी फिटर आदी कामगारवर्गांना मुली दिल्या जात नाहीत, याची त्यांनी खंत व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक शंकर मासेकर […]