LIVE: महाराष्ट्रातील अभयारण्याबाहेरील वाघांसाठी पहिल्यांदाच ५.४० कोटी मंजूर
Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील अभयारण्याबाहेरील १८० वाघांच्या व्यवस्थापनासाठी ₹५.४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मानव-वाघ संघर्ष सोडवण्यासाठी सहा वन विभागांना ₹९० लाख निधी देण्यात येईल.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही डॉकयार्डच्या सर्व्हे यार्डमध्ये गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दल आणि नौदलाच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील अभयारण्याबाहेरील १८० वाघांच्या व्यवस्थापनासाठी एनटीसीएने ५.४० कोटी रुपये मंजूर केले; मानव-वाघ संघर्ष सोडवण्यासाठी सहा वन विभागांना ९० लाख रुपये देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
