LIVE: एकनाथ खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Marathi Breaking News Live Today: पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसीजमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि …

LIVE: एकनाथ खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Marathi Breaking News Live Today: पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसीजमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

 
भाजपने मुंबई महापौरपदासाठी रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. घाटकोपरमधून पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या तावडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले

मुंबई महापौरपदासाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू तावडे यांचे नाव जाहीर होताच घाटकोपरमधील रहिवाशांमध्ये आनंदाची लाट पसरली.

 
मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गंभीर द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण मजकुरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.