ब्राझीलकडून नेतान्याहूंवर नरसंहाराचा आरोप

इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिले प्रत्युत्तर वृत्तसंस्था/ ब्राझिलिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे गाझामध्ये नरसंहार घडवून आणत असल्याचा आरोप ब्राझीलचे अध्यक्ष लूला डा सिल्वा यांनी केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. नेतान्याहू गाझात नरसंहार घडवून आणत आहेत. हिटलरने ज्याप्रकारे ज्यूंचा छळ केला होता, त्याचीच […]

ब्राझीलकडून नेतान्याहूंवर नरसंहाराचा आरोप

इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे गाझामध्ये नरसंहार घडवून आणत असल्याचा आरोप ब्राझीलचे अध्यक्ष लूला डा सिल्वा यांनी केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.
नेतान्याहू गाझात नरसंहार घडवून आणत आहेत. हिटलरने ज्याप्रकारे ज्यूंचा छळ केला होता, त्याचीच पुनरावृत्ती नेतान्याहू हे पॅलेस्टिनींवर करत आहेत. गाझामधील इस्रायलची कारवाई ही होलोकास्टसारखीच असल्याचे लूला डा सिल्वा यांनी म्हटले आहे.
ब्राझीलच्या अध्यक्षांच्या या वक्तव्याला इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी लाजिरवाणे ठरविले आहे. तसेच इस्रायलच्या सरकारने ब्राझीलच्या राजदूताला पाचारण करत स्वत:चा निषेध नोंदविला आहे.
इथियोपियाची राजधानी अदीस अबाबामध्ये आयोजित आफ्रियन युनियन समिटमध्ये लूला यांनी इस्रायल-हमास युद्धावर चर्चा केली. तसेच त्यांनी युद्ध आणि नरसंहारात फरक असतो असे म्हटले आहे. युद्ध हे दोन देशांच्या सैनिकांदरम्यान होते, परंतु गाझामध्ये सैनिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांवर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.