ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

India Tourism : भारतात त्रिदेवांना फार महत्व आहे. त्रिदेव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश होय. या त्रिदेवांपैकी एक असलेले ब्रम्हाजींचे मंदिर देशात फक्त राजस्थानमधील पुष्करमध्येच का बांधले गेले आहे. हिंदू धर्मात ब्रम्हदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून …

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

India Tourism : भारतात त्रिदेवांना फार महत्व आहे. त्रिदेव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश होय. या त्रिदेवांपैकी एक असलेले ब्रम्हाजींचे मंदिर देशात फक्त राजस्थानमधील पुष्करमध्येच का बांधले गेले आहे. हिंदू धर्मात ब्रम्हदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते. पण संपूर्ण देशात फक्त राजस्थानच्या पुष्करमध्ये ब्रम्हदेवाचे मंदिर आहे, जिथे त्यांची पूजा केली जाते आणि वर्षातून एकदा येथे मोठी जत्रा भरते.  

 

तसेच देशात भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची अनेक मंदिरे पाहायला मिळतात, परंतु ब्रम्हदेवाची पूजा फार कमी लोकांनी ऐकली किंवा पाहिली असेल. यामागे एक कथा आहे.  

 

पुष्कर मंदिर पौराणिक कथा-

पौराणिक मान्यतेनुसार वज्रनाश या राक्षसाचा वध केल्यानंतर ब्रम्हदेवाला यज्ञ करायचा होता. पती-पत्नीने यज्ञ करणे बंधनकारक होते. अशा स्थितीत ब्रम्हाजींनी आपली पत्नी सरस्वती हिला यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले परंतु काही कारणास्तव सरस्वतीजी यज्ञाला वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. अशा स्थितीत यज्ञ पूर्ण करण्यासाठी ब्रम्हदेवाने गुर्जर पंथातील गायत्री नावाच्या मुलीशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला. जेव्हा देवी सरस्वती यज्ञस्थळी पोहोचली आणि ब्रम्हाजींच्या शेजारी दुसरी मुलगी दिसली तेव्हा ती खूप रागावली आणि ब्रम्हदेवांना शाप दिला की संपूर्ण जगात कोणीही त्यांची पूजा करणार नाही. या कामात भगवान विष्णूनेही ब्रम्हदेवाची मदत केली होती, त्यामुळे देवीने त्यांना शाप दिला की पत्नीपासून विभक्त होण्याचे दुःख त्यांना भोगावे लागेल. यानंतर देवांनी देवी सरस्वतीला खूप समजावले, तेव्हा देवी म्हणाली की संपूर्ण जगात ब्रम्हदेवाची पूजा पुष्कर नावाच्या मंदिरातच होईल. या कारणास्तव संपूर्ण भारतात ब्रम्हदेवाचे एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे. 

 

पुष्कर मंदिराचे महत्त्व-

मान्यतेनुसार पुष्कर हा सर्व तीर्थांचा गुरू आहे. चारधाम यात्रेनंतर पुष्करमध्ये स्नान केल्याशिवाय त्याला त्याच्या पुण्यचे फळ मिळत नाही, असे मानले जाते. ब्रम्हाजींनी ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी पुष्करजीमध्ये यज्ञाचे आयोजन केले होते, असेही सांगितले जाते. यासाठी लाखो भाविक दरवर्षी पुष्कर मध्ये दाखल होतात.