दुधी भोपळ्याचा डोसा रेसिपी

साहित्य- दुधी भोपळा किस एक कप तांदळाचे पीठ 1/4 कप रवा 1/2 कप दही एक बारीक कापलेली हिरवी मिरची दोन चमचे हिरवी कोथिंबीर 1/4 चमचे हळद 1/4 चमचे लाल तिखट

दुधी भोपळ्याचा डोसा रेसिपी

साहित्य-

दुधी भोपळा किस 

एक कप तांदळाचे पीठ 

1/4 कप रवा 

1/2 कप दही 

एक बारीक कापलेली हिरवी मिरची 

दोन चमचे हिरवी कोथिंबीर 

1/4 चमचे हळद 

1/4 चमचे लाल तिखट 

चवीनुसार मीठ 

तेल 

आवश्यकतेनुसार पाणी 

 

कृती-

सर्वात आधी दुधी भोपळाचे साल काढून तो धुवून घ्यावा व त्याला किसून घेऊन किस हाताने दाबून त्यामधील पाणी काढून घ्यावे. यानंतर किसलेला दुधी भोपळा, तांदळाचे पीठ, रवा, दही, हिरवी मिरची, हिरवे धणे, हळद, तिखट आणि मीठ हे चांगले मिक्स करा. सर्व मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालावे. व काही मिनिट भिजू द्यावे. आता नॉन-स्टिक पॅन घेऊन मध्यम आचेवर गरम करून त्याला थोडे थोडे तेल लावावे. आता पळीच्या मदतीने हे मिश्रण तव्यावर घालून डोसा बनवावा. डोसा सोनेरी आणि कुरकुरीत होऊ लागला की, तो उलटा आणि दुसऱ्या बाजूनेही शिजवा. तरचला तयार आहे आपला  दुधी भोपळ्याचा डोसा, टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik