जून 2024 पर्यंत 220 हून अधिक मॅनहोल्सची झाकणं चोरीला

अंधेरी (andheri) पूर्व येथील  नाल्यात पडून एका 45 वर्षीय महिलेचा  मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याला उत्तर म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या घटनेने मुंबईतील (mumbai) मॅनहोल्सवरील झाकण चोरीला गेल्याच्या प्रकरणाने पुन्हा लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या (bmc) आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 220 मॅनहोल्सची झाकण चोरी (theft) झाली. जून महिन्यात सर्वाधिक 61 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर मे महिन्यात 46 चोरीच्या घटना घडल्या आहेत. डी वॉर्ड (मलबार हिल) मध्ये 16 मॅनहोल्सची झाकणे चोरीला गेली. के/पश्चिम (अंधेरी पश्चिम) आणि के/पूर्व (अंधेरी पूर्व) मध्ये प्रत्येकी 13 झाकणे चोरीला गेली. दरम्यान, बोरिवलीच्या (borivali) आर/सेंट्रल वॉर्डातही सर्वाधिक 32 कव्हर गायब आहेत. चोरीच्या घटनांना प्रतिसाद म्हणून महापालिकेने गेल्या वर्षी स्मार्ट मॅनहोल प्रकल्प सुरू केला. मॅनहॉल्सच्या झाकणांमध्ये सेन्सर स्थापित करणे हे यामागचे उद्दिष्ट होते, जे शिफ्ट केल्यावर अलर्ट अलार्म वाजतील. तसेच अधिकारी मॅनहोल्सच्या झाकणांना साखळ्यांसह सुरक्षित करण्याचा देखील विचार करत होते. परंतु हे वाहनांसाठी धोकादायक ठरेल. तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने (एचसी) देखील हस्तक्षेप केला आणि महापालिकेला पूरप्रवण भागात मॅनहोल्सवर सुरक्षित साखळ्या बसविण्याचे निर्देश दिले. 2023 पर्यंत, प्रशासनाने 1,900 मॅनहोलवर साखळ्या बसवल्या होत्या. तथापि, मुंबईतील 74,000 मॅनहोल्सपैकी केवळ 2.5% च मॅनहोल्सचे काम झाल्याने हायकोर्टाने या संथ कामकाजावर टीका केली होती. 2024 च्या पावसाळ्यापूर्वी सर्व मॅनहोल्स सुरक्षित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर महापालिकेने दावा केला आहे की त्यांनी आता 99% मॅनहोल्स झाकले आहेत. विमला अनिल गायकवाड ही महिला 26 सप्टेंबर रोजी उघड्या मॅनहोल मध्ये पडली होती. या महिलेचा मृतदेह 50 फूट अंतरावर नाल्याच्या दुसऱ्या भागात आढळून आला होता.हेही वाचा सुनील तटकरेंची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती दिवाळी, छठपूजेसाठी रेल्वे विशेष गाड्या सोडणार

जून 2024 पर्यंत 220 हून अधिक मॅनहोल्सची झाकणं चोरीला

अंधेरी (andheri) पूर्व येथील  नाल्यात पडून एका 45 वर्षीय महिलेचा  मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याला उत्तर म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली.या घटनेने मुंबईतील (mumbai) मॅनहोल्सवरील झाकण चोरीला गेल्याच्या प्रकरणाने पुन्हा लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या (bmc) आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 220 मॅनहोल्सची झाकण चोरी (theft) झाली. जून महिन्यात सर्वाधिक 61 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर मे महिन्यात 46 चोरीच्या घटना घडल्या आहेत.डी वॉर्ड (मलबार हिल) मध्ये 16 मॅनहोल्सची झाकणे चोरीला गेली. के/पश्चिम (अंधेरी पश्चिम) आणि के/पूर्व (अंधेरी पूर्व) मध्ये प्रत्येकी 13 झाकणे चोरीला गेली. दरम्यान, बोरिवलीच्या (borivali) आर/सेंट्रल वॉर्डातही सर्वाधिक 32 कव्हर गायब आहेत.चोरीच्या घटनांना प्रतिसाद म्हणून महापालिकेने गेल्या वर्षी स्मार्ट मॅनहोल प्रकल्प सुरू केला. मॅनहॉल्सच्या झाकणांमध्ये सेन्सर स्थापित करणे हे यामागचे उद्दिष्ट होते, जे शिफ्ट केल्यावर अलर्ट अलार्म वाजतील. तसेच अधिकारी मॅनहोल्सच्या झाकणांना साखळ्यांसह सुरक्षित करण्याचा देखील विचार करत होते. परंतु हे वाहनांसाठी धोकादायक ठरेल. तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने (एचसी) देखील हस्तक्षेप केला आणि महापालिकेला पूरप्रवण भागात मॅनहोल्सवर सुरक्षित साखळ्या बसविण्याचे निर्देश दिले. 2023 पर्यंत, प्रशासनाने 1,900 मॅनहोलवर साखळ्या बसवल्या होत्या.तथापि, मुंबईतील 74,000 मॅनहोल्सपैकी केवळ 2.5% च मॅनहोल्सचे काम झाल्याने हायकोर्टाने या संथ कामकाजावर टीका केली होती. 2024 च्या पावसाळ्यापूर्वी सर्व मॅनहोल्स सुरक्षित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर महापालिकेने दावा केला आहे की त्यांनी आता 99% मॅनहोल्स झाकले आहेत.विमला अनिल गायकवाड ही महिला 26 सप्टेंबर रोजी उघड्या मॅनहोल मध्ये पडली होती. या महिलेचा मृतदेह 50 फूट अंतरावर नाल्याच्या दुसऱ्या भागात आढळून आला होता. हेही वाचासुनील तटकरेंची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीदिवाळी, छठपूजेसाठी रेल्वे विशेष गाड्या सोडणार

Go to Source