एटीपीच्या दोन स्पर्धांमध्ये बोपण्णा-बालाजी खेळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारातील पुरूष दुहेरीमध्ये एकत्रित खेळणाऱ्या रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी एटीपीच्या आगामी दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकपूर्वी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकसाठी रोहन बोपण्णाच्या विनंतीवरुन श्रीराम बालाजी पुरुष दुहेरीत साथीदार म्हणून खेळण्यात केंद्रिय क्रीडा युवजन ख्घते आणि स्पोर्टस् मिशन ऑलिंपिक […]

एटीपीच्या दोन स्पर्धांमध्ये बोपण्णा-बालाजी खेळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारातील पुरूष दुहेरीमध्ये एकत्रित खेळणाऱ्या रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी एटीपीच्या आगामी दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकपूर्वी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत.
पॅरिस ऑलिंपिकसाठी रोहन बोपण्णाच्या विनंतीवरुन श्रीराम बालाजी पुरुष दुहेरीत साथीदार म्हणून खेळण्यात केंद्रिय क्रीडा युवजन ख्घते आणि स्पोर्टस् मिशन ऑलिंपिक सेल (एमओसी) यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. एटीपीच्या हॅमबुर्ग आणि युमेग येथे होणाऱ्या 500 दर्जाच्या टेनिस स्पर्धांमध्ये बोपण्णा आणि श्रीराम बालाजी पुरूष दुहेरीत एकत्रित खेळणार आहेत.
भारतीय नेमबाज रिदम सांगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिष बनवाला यांनी ऑलिंपिक प्रशिक्षण शिबिरामध्ये वैयक्तिक प्रशिक्षक किंवा ट्रेनर यांच्या खर्चाला एमओसीने अधिकृत मंजुरी दिली आहे. भारताचे स्किट नेमबाज माहेश्वरी चौहान, अनंतजितसिंग नेरुका यांना सरावासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून या प्रशिक्षकांच्या आर्थिक खर्चाला क्रीडा युवजन खात्यातर्फे मंजुरी देण्यात आली आहे.