बोनसमध्ये सोन्याचा कीबोर्ड कॅप
किमत ऐकून व्हाल दंग
चीनच्या एका तंत्रज्ञान कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अशी गिफ्ट दिली आहे, ज्याविषयी कुणी विचारही केला नव्हता. प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीच्या बॉसकडून सोन्याने निर्मित कॉम्प्युटर कीबोर्डचा कॅप देण्यात आला आहे. सध्या या बोनस गिफ्टची मोठी चर्चा होत आहे. कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना सोने याकरता देत नाही, की हे महागडे बोनस गिफ्ट आहे, तर याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडे सोन्याच्या स्वरुपात आर्थिक स्थिरता येऊ शकते म्हणून हे गिफ्ट देण्यात आल्याचे चिनी कंपनीच्या बॉसने सांगितले आहे. ही चिनी तंत्रज्ञान कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना सलग 4 वर्षांपासून बोनसच्या स्वरुपात सोन्याचे कीकॅप्स देत असून यामुळे कर्मचाऱ्यांना निधी व्यवस्थापनात मदत होत आहे. दक्षिण गुआंग्डोंग प्रांताच्या शेनझेन येथील फर्म इन्स्टा 360 ने चीनमध्ये प्रोग्रामर दिन साजरा करत अनेक उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना 21 गोल्ड कीकॅप भेट म्हणून दिले आहेत.
40 लाख रुपये किंमत
या कीबोर्ड कॅप्समध्ये सर्वात वजनी कीकॅपचे वजन 35.02 ग्रॅम असून सध्या याची किंमत जवळपास 40 लाख रुपये आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या गोल्ड बोनसचे मूल्य पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. ही कंपनी 360-डिग्री कॅमेऱ्यांच्या क्षेत्रात एक प्रमुख ब्रँड आहे, इन्स्टा360 गोप्रोला तीव्र स्पर्धा देते. चिनी तंत्रज्ञान उद्योगात कर्मचाऱ्यांना सोन्याचा बोनस देण्याच्या परंपरेमुळे या कंपनीला स्थानिक भाषेत गोल्ड फॅक्टरी म्हटले जात आहे.
Home महत्वाची बातमी बोनसमध्ये सोन्याचा कीबोर्ड कॅप
बोनसमध्ये सोन्याचा कीबोर्ड कॅप
किमत ऐकून व्हाल दंग चीनच्या एका तंत्रज्ञान कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अशी गिफ्ट दिली आहे, ज्याविषयी कुणी विचारही केला नव्हता. प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीच्या बॉसकडून सोन्याने निर्मित कॉम्प्युटर कीबोर्डचा कॅप देण्यात आला आहे. सध्या या बोनस गिफ्टची मोठी चर्चा होत आहे. कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना सोने याकरता देत नाही, की हे महागडे बोनस गिफ्ट आहे, तर याच्या […]
