विशाळगड अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती! ऐन पावसाळ्यातच का सुरू केली अशी मुंबई हायकोर्टाची विचारणा
गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्या राज्यभरात चर्चा असलेल्या विशाळगड अतिक्रमण विरोधातील कारवाईला आज हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटावची मोहीम का हातात घेतली अशी विचारणा करून निवासी अतिक्रमणावरील कारवाई तात्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात सरकारने ठोस पावले उचलावी नाहीतर आम्हाला मोहीम हाथी घ्यावी लागेल असा इशारा देत संभाजीराजे छत्रपती यांनी १४ जुलै रोजी ‘चलो विशाळगड’ची हाक दिली होती. यावेळी झालेल्या दंगलसदृश आंदोलनामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील अनेक रहिवाशांची घरे आणि दुकानांची आंदोलकांकडून नासधूस करण्यात आली होती.
या घटनेनंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारच्या या कारवाईविऱोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकेवर आज सुनावणी करण्यात येऊन हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने या सुनावणीमध्ये मुख्यत्वे विशाळगडावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देत ही कारवाई ऐन पावसाळ्यातच का सुरू केली ? अशी विचारणा कोर्टाकडून राज्य सरकारला करण्यात आली. तसेच पावसाळा होईपर्यंत निवासी अतिक्रमणांना हात न लावता ही कारवाई थांबवावी असे निर्देश दिले आहेत.
हि कारवाई हाती घेण्याअगोदर राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला पावसाळा होईपर्यंत निवासी अतिक्रमणांना हात न लावण्याचा शब्द दिला होता . त्यामुळे ऐन पावसाळ्यातच ही अतिक्रमण विरोधी कारवाई का सुरू केली ? अशी विचारणा हायकोर्टाकडून राज्य सरकारला करण्यात आली. या कारवाई दरम्यान आत्तापर्यंत शंभरावर अतिक्रमणे चार दिवसात हटवण्यात आली असून हायकोर्टाच्या या निर्देशानंतर आता या कारवाईला स्थगिती आली आहे.
Home महत्वाची बातमी विशाळगड अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती! ऐन पावसाळ्यातच का सुरू केली अशी मुंबई हायकोर्टाची विचारणा
विशाळगड अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती! ऐन पावसाळ्यातच का सुरू केली अशी मुंबई हायकोर्टाची विचारणा
गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्या राज्यभरात चर्चा असलेल्या विशाळगड अतिक्रमण विरोधातील कारवाईला आज हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटावची मोहीम का हातात घेतली अशी विचारणा करून निवासी अतिक्रमणावरील कारवाई तात्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात सरकारने ठोस पावले उचलावी नाहीतर आम्हाला मोहीम हाथी घ्यावी लागेल असा इशारा देत संभाजीराजे […]
