नॉटिंगहॅम स्पर्धेत बोल्टर विजेती

वृत्तसंस्था/ लंडन डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या नॉटिगहॅम खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत 31 व्या मानांकित केटी बोल्टरने माजी टॉप सिडेड कॅरोलिना प्लिसकोव्हाचा पराभव करत जेतेपद स्वत:कडे राखले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या केटी बोल्टरने प्लिसकोव्हाचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. बोल्टरने उपांत्य फेरीच्या सामन्यात 2021 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील विजेती इमा राडुकेनूचा पराभव करत […]

नॉटिंगहॅम स्पर्धेत बोल्टर विजेती

वृत्तसंस्था/ लंडन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या नॉटिगहॅम खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत 31 व्या मानांकित केटी बोल्टरने माजी टॉप सिडेड कॅरोलिना प्लिसकोव्हाचा पराभव करत जेतेपद स्वत:कडे राखले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या केटी बोल्टरने प्लिसकोव्हाचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. बोल्टरने उपांत्य फेरीच्या सामन्यात 2021 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील विजेती इमा राडुकेनूचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.