लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? म्हणत पुन्हा एकदा धमकी
सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली आहे. सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या घराबाहेर एप्रिल महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना अटक केली होती.अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधकारी सकाळी बँड स्टँड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक दरम्यान सलीम खान यांच्यासोबत त्यांचे चाहते, गरजू व्यक्तीदेखील संवाद साधत असतात. 18 सप्टेंबर रोजी एका दुचाकीवरून पुरुष आणि बुरखादारी महिला सलीम खान यांच्याजवळ आले. त्यावेळी महिलेने सलीम खान यांना उद्देशून लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? असे म्हणत धमकी दिली आणि पलायन केले. वांद्रे पोलिसांनी या धमकी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या अज्ञात बुरखाधारी महिलेचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 च्या सुमारास सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या घराबाहेर काही राऊंड गोळीबार करून पळ काढला होता. मात्र, गुन्हे शाखेने तपासानंतर आरोपींना अटक केली होती. हा गोळीबार सलमानला घाबरवण्यासाठी झाला असा प्राथमिक अंदाज होता. 1998 साली ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने आपल्या राजस्थानमधील दिवसात दोन वेळा काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. गँगस्टर बिश्नोई हा ज्या बिश्नोई समाजातून येतो तो समाज निसर्ग पूजक आहे. त्या समाजात या काळवीट आणि इतर प्राण्यांना देवासमान मानले जाते. काळवीटाचीृशिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जाते. हेही वाचाराष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात
प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदेरा रझांचे पेंटिंग गायब
Home महत्वाची बातमी लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? म्हणत पुन्हा एकदा धमकी
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? म्हणत पुन्हा एकदा धमकी
सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली आहे. सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या घराबाहेर एप्रिल महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना अटक केली होती.
अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधकारी सकाळी बँड स्टँड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक दरम्यान सलीम खान यांच्यासोबत त्यांचे चाहते, गरजू व्यक्तीदेखील संवाद साधत असतात.
18 सप्टेंबर रोजी एका दुचाकीवरून पुरुष आणि बुरखादारी महिला सलीम खान यांच्याजवळ आले. त्यावेळी महिलेने सलीम खान यांना उद्देशून लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? असे म्हणत धमकी दिली आणि पलायन केले. वांद्रे पोलिसांनी या धमकी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या अज्ञात बुरखाधारी महिलेचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत.
14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 च्या सुमारास सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या घराबाहेर काही राऊंड गोळीबार करून पळ काढला होता. मात्र, गुन्हे शाखेने तपासानंतर आरोपींना अटक केली होती. हा गोळीबार सलमानला घाबरवण्यासाठी झाला असा प्राथमिक अंदाज होता.
1998 साली ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने आपल्या राजस्थानमधील दिवसात दोन वेळा काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
गँगस्टर बिश्नोई हा ज्या बिश्नोई समाजातून येतो तो समाज निसर्ग पूजक आहे. त्या समाजात या काळवीट आणि इतर प्राण्यांना देवासमान मानले जाते. काळवीटाचीृशिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जाते. हेही वाचा
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघातप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदेरा रझांचे पेंटिंग गायब