पाणी उकळून प्या, निरोगी रहा

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे आवाहन बेळगाव : पावसामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासाठी नागरिकांनी पाणी उकळून पिणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर पाण्याची चाचणी करून पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी ग्राम. पं. च्या माध्यमातून पाणी उकळून पिण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिली. पावसाबरोबर रोगही येतात. […]

पाणी उकळून प्या, निरोगी रहा

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे आवाहन
बेळगाव : पावसामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासाठी नागरिकांनी पाणी उकळून पिणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर पाण्याची चाचणी करून पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी ग्राम. पं. च्या माध्यमातून पाणी उकळून पिण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिली.
पावसाबरोबर रोगही येतात. याला पाण्यात होणारा बदल हे महत्त्वाचे कारण आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य जपण्याकरिता पाणी उकळून पिणे आवश्यक असून याचे पालन करून निरोगी रहा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील अंगणवाडींचा अहवाल घेण्यात आला असून, जीर्ण झालेल्या अंगणवाड्यांचे स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन सुटी घेण्यासाठीही सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी विकास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राम. पं. मध्ये विकास अधिकारी हजर राहून याचे पालन करत आहेत. 95 टक्के पीडीओ ग्राम. पं. ना हजर रहात असल्याची माहिती ई हजेरीच्या माध्यमातून निदर्शनास आली आहे. त्यामुळे ग्राम. पं. च्या व्याप्तीतील परिस्थितीवर नजर असल्याचे त्यांनी सांगितले.