तिलारी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह आढळला
वार्ताहर /तुडये
बुधवारी सायंकाळी हजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या फिवोना जमूला (वय 11, रा. आंबेडकर गल्ली, सुळगा-हिंडलगा) या मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी धरणाच्या काठाजवळ पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर पाण्याबाहेर काढण्यात आला. सुळगा (हिं.) येथील सलोमन जमूला हे आपल्या दोन मुलींसह हजगोळी येथील चाळोबा देवालय परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सलोमन व फिवोना हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. सलोमन व फिवोना हे बुडत असताना तेथे असलेल्या युवकांनी सलोमन यांना पाण्यातून बाहेर काढत वाचविले. तर फिवोना ही बुडाली. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीमद्वारे मृतदेह शोधमोहीम करण्यात येणार होती. मात्र सकाळी 8 वाजता हजगोळीचे पोलीस पाटील देवाप्पा सुतार यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर काठावर आणण्यात आला. चंदगड पोलीस स्थानकाचे हवालदार अमोल पाटील व अनिल सरंबळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविला. मृतदेह शोधमोहिमेसाठी बेळगाव येथील एचईआरएफ रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र त्याआधीच मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला होता.
Home महत्वाची बातमी तिलारी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह आढळला
तिलारी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह आढळला
वार्ताहर /तुडये बुधवारी सायंकाळी हजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात बुडालेल्या फिवोना जमूला (वय 11, रा. आंबेडकर गल्ली, सुळगा-हिंडलगा) या मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी धरणाच्या काठाजवळ पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर पाण्याबाहेर काढण्यात आला. सुळगा (हिं.) येथील सलोमन जमूला हे आपल्या दोन मुलींसह हजगोळी येथील चाळोबा देवालय परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सलोमन […]