एसबीआयच्या संचालक मंडळाची निधी उभारण्यास मान्यता

आर्थिक वर्ष 2025 मध्ये 25,073 कोटी रुपये उभारणार : जानेवारीत 5000 कोटी उभारले नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025 मध्ये कर्जाद्वारे 3 अब्ज डॉलर (25,073 कोटी रुपये) उभारण्यास मान्यता दिली आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज देणाऱ्या एसबीआयने 11 जून रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. एसबीआयने […]

एसबीआयच्या संचालक मंडळाची निधी उभारण्यास मान्यता

आर्थिक वर्ष 2025 मध्ये 25,073 कोटी रुपये उभारणार : जानेवारीत 5000 कोटी उभारले
नवी दिल्ली :
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025 मध्ये कर्जाद्वारे 3 अब्ज डॉलर (25,073 कोटी रुपये) उभारण्यास मान्यता दिली आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज देणाऱ्या एसबीआयने 11 जून रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.
एसबीआयने म्हटले आहे की, बँक सार्वजनिक ऑफरद्वारे किंवा वरिष्ठ सुरक्षित नोट्सच्या खासगी प्लेसमेंटद्वारे एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये निधी उभारेल, जी यूएस डॉलर किंवा इतर मोठ्या विदेशी चलनात असेल. हा निधी कशासाठी वापरला जाईल हे एसबीआयने सांगितले नाही.
अनेक पीएसयू बँका निधी उभारण्याच्या तयारीत
कॅनरा बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसह अनेक पीएसयू  बँका या आर्थिक वर्षात कर्जाद्वारे निधी उभारण्याची योजना बनवत आहेत. चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, कर्जदार विकासाला पाठिंबा देण्यासाठी भागभांडवल उभारण्यास तयार आहेत. मंगळवारी एसबीआयचे शेअर्स 0.44 टक्केच्या वाढीसह 835.50 वर बंद झाले. त्यांचे बाजारमूल्य 7.45 लाख कोटी रुपये आहे.
उत्तम परतावा
एसबीआयच्या समभागाने गुंतवणूकदारांना एका वर्षात 44.39 टक्के परतावा दिला. एसबीआयचा समभाग गेल्या एका महिन्यात 3.30 टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत 36.02 टक्के वाढला आहे.