शिवाजी पार्क घेणार मोकळा श्वास!

दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात धूळ प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखणे आणि शुद्ध हवेसाठी शिवाजी पार्क मैदानात धूळ प्रदूषण रोखणारी मशीन, मैदानातील हवेत उडणारी माती व्हॅक्युम क्लीनरच्या साह्याने ट्रकमध्ये जमा करणे अशा पर्यायांचा अवलंब मुंबई महापालिकेकडून करण्यात आला होता. आता यावर अंतिम उपाय म्हणून शिवाजी पार्क मैदानातील नऊ इंचापर्यंतची माती काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, विधानसभा निवडणुकीनंतर मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तो पाठवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानात अनेकखेळपट्ट्‌या असून, क्रिकेटचा सराव तसेच सामने होत असतात. तसेच फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात  येतात.  येथील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी अखेर आयआयटी आणि व्हीजेटीआयमधील तज्ज्ञांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आता त्यांच्या सल्ल्यानंतर या मैदानातील सहा ते नऊ इंचापर्यंतची माती काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली, जेसीबी मशीनने ही माती काढली जाईल. खड्ढे पडणार नाहीत याची खबरदारीही घेण्यात येणार आहे. माती काढल्यानंतर पाणी फवारणी करून त्यावरून रोलर फिरवून मैदानातील उर्वरित माती सपाट केली जाणार आहे. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंजूर होणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक संपताच प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. 6 डिसेंबरनंतरच माती काढण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.  स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुंबई महापालिकेने मैदानातील हिरवळ कायम ठेवणे, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे यासाठी शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय आठ ते नऊ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती टाकली. या मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला.हेही वाचा ठाणे जिल्ह्याच्या प्रचारात वाहतूक कोंडीचा मुद्दा दुर्लक्षितआवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

शिवाजी पार्क घेणार मोकळा श्वास!

दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात धूळ प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखणे आणि शुद्ध हवेसाठी शिवाजी पार्क मैदानात धूळ प्रदूषण रोखणारी मशीन, मैदानातील हवेत उडणारी माती व्हॅक्युम क्लीनरच्या साह्याने ट्रकमध्ये जमा करणे अशा पर्यायांचा अवलंब मुंबई महापालिकेकडून करण्यात आला होता. आता यावर अंतिम उपाय म्हणून शिवाजी पार्क मैदानातील नऊ इंचापर्यंतची माती काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, विधानसभा निवडणुकीनंतर मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तो पाठवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानात अनेकखेळपट्ट्‌या असून, क्रिकेटचा सराव तसेच सामने होत असतात. तसेच फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात  येतात. येथील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी अखेर आयआयटी आणि व्हीजेटीआयमधील तज्ज्ञांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आता त्यांच्या सल्ल्यानंतर या मैदानातील सहा ते नऊ इंचापर्यंतची माती काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली, जेसीबी मशीनने ही माती काढली जाईल. खड्ढे पडणार नाहीत याची खबरदारीही घेण्यात येणार आहे.माती काढल्यानंतर पाणी फवारणी करून त्यावरून रोलर फिरवून मैदानातील उर्वरित माती सपाट केली जाणार आहे. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंजूर होणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक संपताच प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. 6 डिसेंबरनंतरच माती काढण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुंबई महापालिकेने मैदानातील हिरवळ कायम ठेवणे, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे यासाठी शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय आठ ते नऊ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती टाकली. या मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला.हेही वाचाठाणे जिल्ह्याच्या प्रचारात वाहतूक कोंडीचा मुद्दा दुर्लक्षित
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

Go to Source