पालिका मंडईची जागा भाडेतत्त्वावर देणार
मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यातील भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागाही तशीच देण्यावर मुंबई महापालिकेने शिक्कामोर्तब केले आहे. मंडईची जागा भाडेतत्वावर देऊन महापालिकेला तब्बल 2 हजार 100 कोटी रुपये महसूल मिळणार आहे.मुंबई महापालिकेचे मोकळे भूखंड लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तीन भूखंडांची निवडही केली आहे. मुंबई महापालिकेच्या ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्ट उपक्रमाचे बेस्ट रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्टची काही जागा देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडई पाडण्यात आली आहे. यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केटमधील जागेमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र मच्छिमारांनी याला विरोध केला होता आणि हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती होती. मात्र तोडगा निघाल्याने मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेला मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी प्राप्त झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यातून ज्या कंपन्यांना प्रतिसाद मिळेल, त्यांना ही जागा व्यावसायिक बांधकाम, रहिवाशी संकुल बांधकाम किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी दिली जाईल.यातून महापालिकेला 2 हजार 100 कोटी रुपये महसूल कंपनीकडून उपलब्ध होईल. ही जागा 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली जाईल. त्यानंतर गरजेनुसार त्याला मुदतवाढही देण्याची तरतूद असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एखादे बांधकाम उभारल्यानंतर महापालिका दर महिन्याला स्वतंत्र भाडे आकारणी करणार आहे.हेही वाचाऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाला आर्थिक पाठबळ
महाराष्ट्रातील डान्स बारच्या नियमात बदल
Home महत्वाची बातमी पालिका मंडईची जागा भाडेतत्त्वावर देणार
पालिका मंडईची जागा भाडेतत्त्वावर देणार
मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यातील भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागाही तशीच देण्यावर मुंबई महापालिकेने शिक्कामोर्तब केले आहे. मंडईची जागा भाडेतत्वावर देऊन महापालिकेला तब्बल 2 हजार 100 कोटी रुपये महसूल मिळणार आहे.
मुंबई महापालिकेचे मोकळे भूखंड लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तीन भूखंडांची निवडही केली आहे. मुंबई महापालिकेच्या ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्ट उपक्रमाचे बेस्ट रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्टची काही जागा देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मंडई पाडण्यात आली आहे. यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केटमधील जागेमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र मच्छिमारांनी याला विरोध केला होता आणि हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती होती.
मात्र तोडगा निघाल्याने मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेला मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी प्राप्त झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यातून ज्या कंपन्यांना प्रतिसाद मिळेल, त्यांना ही जागा व्यावसायिक बांधकाम, रहिवाशी संकुल बांधकाम किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी दिली जाईल.
यातून महापालिकेला 2 हजार 100 कोटी रुपये महसूल कंपनीकडून उपलब्ध होईल. ही जागा 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली जाईल. त्यानंतर गरजेनुसार त्याला मुदतवाढही देण्याची तरतूद असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एखादे बांधकाम उभारल्यानंतर महापालिका दर महिन्याला स्वतंत्र भाडे आकारणी करणार आहे.हेही वाचा
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाला आर्थिक पाठबळमहाराष्ट्रातील डान्स बारच्या नियमात बदल