महापालिका मुर्तिकारांना मोफत शाडूची माती देणार

पुढील वर्षी येणारा गणेशोत्सव (ganeshotsav) पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई (mumbai) महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने (bmc) मुर्तिकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेने (BMC) आयोजित केलेल्या बैठकीत पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केवळ माती देण्याचे आश्वासन नको असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच माती देऊन जबाबदारी न झटकता या विषयावरून होणारे राजकारणही थांबवले गेले पाहिजे असे मत मूर्तीकारांच्या संघटनेने व्यक्त केले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींवर 2020 मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. पीओपीवर बंदी घालून चार वर्षे झाली असली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांना पीओपीच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरले. यावरून उच्च न्यायालयाने (high court) महापालिका आणि राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरेही ओढले होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवर्षी पीओपी बंदीचा विषय वारंवार चर्चेत येत असतो. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून पालिकेने आतापासून नियोजन सुरू केले आहे. याबाबतची एक प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पीओपीला सक्षम पर्याय देण्याकरीता सीपीसीबीसह एक बैठक घेण्याचा ठराव करण्यात आला. तसेच या बैठकीत पुढील वर्षाकरीता मुंबई महापालिकेतर्फे मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागा व शाडूची माती देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.हेही वाचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, पण… अंधेरीतील भूमिगत मार्केटचा प्रकल्प पुन्हा रखडला

महापालिका मुर्तिकारांना मोफत शाडूची माती देणार

पुढील वर्षी येणारा गणेशोत्सव (ganeshotsav) पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई (mumbai) महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने (bmc) मुर्तिकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेने (BMC) आयोजित केलेल्या बैठकीत पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केवळ माती देण्याचे आश्वासन नको असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच माती देऊन जबाबदारी न झटकता या विषयावरून होणारे राजकारणही थांबवले गेले पाहिजे असे मत मूर्तीकारांच्या संघटनेने व्यक्त केले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींवर 2020 मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. पीओपीवर बंदी घालून चार वर्षे झाली असली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांना पीओपीच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरले. यावरून उच्च न्यायालयाने (high court) महापालिका आणि राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरेही ओढले होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवर्षी पीओपी बंदीचा विषय वारंवार चर्चेत येत असतो. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून पालिकेने आतापासून नियोजन सुरू केले आहे. याबाबतची एक प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पीओपीला सक्षम पर्याय देण्याकरीता सीपीसीबीसह एक बैठक घेण्याचा ठराव करण्यात आला. तसेच या बैठकीत पुढील वर्षाकरीता मुंबई महापालिकेतर्फे मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागा व शाडूची माती देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.हेही वाचाउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, पण…अंधेरीतील भूमिगत मार्केटचा प्रकल्प पुन्हा रखडला

Go to Source