निवडणुकीच्या ड्युटीवर गेले पण अद्याप कामावर रुजू झालेच नाही

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या (vidhan sabha elections) ड्युटीवर महापालिकेचे (bmc) कर्मचारी कार्यरत होते. मात्र आता निवडणुका पार पडून निकालही लागला आहे. तरीही, महापालिकेचे 5000 कर्मचारी अद्याप कामावर नियमितपणे रूजू झालेले नाहीत.  महापालिकेचे (BMC) कर्मचारी कामावर येत नसल्यामुळे विविध विभागांच्या आणि कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, पालिकेने कर्मचाऱ्यांना (employees) आठवडाभरात कामावर रूजू व्हा अन्यथा पगार कपात (salary cut) करण्यात येईल असा इशारा दिला आहे. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कामे नियुक्त केली जातात. ज्यात मतदार याद्या तयार करणे, नवीन नोंदणी करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणुकीच्या दिवशी मतदान आणि मतमोजणी यासारखी कामे व्यवस्थापित करणे इ. कामे यात समाविष्ट आहे. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी एकूण 60,000 पालिका अधिकारी आणि कर्मचारी निवडणूकीचे कर्तव्य बजावत होते. गेल्या दोन महिन्यांत, यापैकी अंदाजे 9,674 कर्मचाऱ्यांना विशेषतः निवडणुकीशी संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते.  काही जण त्यांच्या कामावर रुजू झाले आहेत. तर, उर्वरित कर्मचारी परत आले नाहीत, त्यामुळे कामे अडकून पडली आहे. या विलंबामुळे विविध पालिका विभागांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. हेही वाचा भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता धारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी

निवडणुकीच्या ड्युटीवर गेले पण अद्याप कामावर रुजू झालेच नाही

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या (vidhan sabha elections) ड्युटीवर महापालिकेचे (bmc) कर्मचारी कार्यरत होते. मात्र आता निवडणुका पार पडून निकालही लागला आहे. तरीही, महापालिकेचे 5000 कर्मचारी अद्याप कामावर नियमितपणे रूजू झालेले नाहीत. महापालिकेचे (BMC) कर्मचारी कामावर येत नसल्यामुळे विविध विभागांच्या आणि कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, पालिकेने कर्मचाऱ्यांना (employees) आठवडाभरात कामावर रूजू व्हा अन्यथा पगार कपात (salary cut) करण्यात येईल असा इशारा दिला आहे.पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कामे नियुक्त केली जातात. ज्यात मतदार याद्या तयार करणे, नवीन नोंदणी करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणुकीच्या दिवशी मतदान आणि मतमोजणी यासारखी कामे व्यवस्थापित करणे इ. कामे यात समाविष्ट आहे.मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी एकूण 60,000 पालिका अधिकारी आणि कर्मचारी निवडणूकीचे कर्तव्य बजावत होते. गेल्या दोन महिन्यांत, यापैकी अंदाजे 9,674 कर्मचाऱ्यांना विशेषतः निवडणुकीशी संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. काही जण त्यांच्या कामावर रुजू झाले आहेत. तर, उर्वरित कर्मचारी परत आले नाहीत, त्यामुळे कामे अडकून पडली आहे. या विलंबामुळे विविध पालिका विभागांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. हेही वाचाभरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यताधारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी

Go to Source