मुंबईत (mumbai) अद्याप एकही मंकीपॉक्सचा (monkeypox) रुग्ण (patient) आढळलेला नाही. तथापि, परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) खबरदारी म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 14 खाटांचा वॉर्ड राखून ठेवला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नका, असे आवाहनही पालिकेने केले आहे.जगातील काही देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेग आणि तीव्रता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांसाठी सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन ‘मंकीपॉक्स’ प्रतिबंध आणि उपाययोजनांसाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे.सेव्हन हिल्स हॉस्पिटल, (seven hills hospital) येथे ‘मंकीपॉक्स’ रुग्णांसाठी एक विशेष वॉर्ड सुरू केला आहे. या कक्षात 14 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याची तयारी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. वेगवेगळ्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये संशयित मंकीपॉक्स व्यक्ती आढळल्यास त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन आणि पुढील उपचारासाठी पाठवले जाईल.विमानतळावरील आरोग्य माहिती कक्ष21 ऑगस्ट 2024 रोजी ‘मंकीपॉक्स’ संदर्भात विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘मंकीपॉक्स’ने बाधित आफ्रिकन देशांतून येणाऱ्या नागरिकांची आणि इतर प्रवाशांची विमानतळ आरोग्य अधिकारी विभागामार्फत तपासणी केली जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आरोग्य माहिती कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे.हेही वाचासर्व महाविद्यालयांमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण बंधनकारकवंदे भारत ट्रेनमधील जेवणात आढळले मेलेले झुरळ
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ‘मंकीपॉक्स’साठी 14 खाटांचा विशेष वॉर्ड