पालिकेने 20,000 बेकायदेशीर होर्डिंग्स हटवले
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोमवारी अंदाजे 20,000 बेकायदेशीर होर्डिंग्स (hoardings), जाहिरात फलक आणि पोस्टर्स (posters) काढले आहेत. या कारवाईबाबत पालिकेने मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाला (bombay hight court) माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात पालिकेतर्फे बेकायदेशीर होर्डिंग्स हटवण्याबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महापालिकेने खुलासा केला की, बेकायदेशीर होर्डिंगपैकी 7,500 राजकीय आहेत, तर सुमारे 8,200 धार्मिक स्वरूपाचे आहेत. तसेच महापालिकेकडून मुंबईतील सर्व 24 महापालिका प्रभागांना सार्वजनिक जागांवर अनधिकृत प्रदर्शनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पूर्वपरवानगीशिवाय राजकीय होर्डिंग्ज लावू नयेत, अशा सूचना छापखाना चालकांना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, जाहिरातदारांना अधिक चांगल्या ट्रॅकिंग आणि अंमलबजावणीसाठी अधिकृत होर्डिंगवर QR कोड समाविष्ट करण्यास सांगितले आहे.महापालिकेने (bmc) बेकायदेशीर होर्डिंगशी संबंधित तक्रारी हाताळण्यासाठी तक्रार अधिकारी नियुक्त केला आहे. तसेच बेकायदेशीर फलकांविरोधात नागरिक ‘आपलं सरकार पोर्टल’ किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरद्वारे तक्रारी नोंदवू शकतात.गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली होती. ज्यात सर्व महापालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींना सार्वजनिक रस्ते, उद्याने आणि इतर जागांमधून बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्यासाठी सात ते दहा दिवसांची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.हेही वाचामुंबई, ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सुरू होणारमहाराष्ट्राच्या 29 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
Home महत्वाची बातमी पालिकेने 20,000 बेकायदेशीर होर्डिंग्स हटवले
पालिकेने 20,000 बेकायदेशीर होर्डिंग्स हटवले
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोमवारी अंदाजे 20,000 बेकायदेशीर होर्डिंग्स (hoardings), जाहिरात फलक आणि पोस्टर्स (posters) काढले आहेत. या कारवाईबाबत पालिकेने मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाला (bombay hight court) माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात पालिकेतर्फे बेकायदेशीर होर्डिंग्स हटवण्याबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती.
न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महापालिकेने खुलासा केला की, बेकायदेशीर होर्डिंगपैकी 7,500 राजकीय आहेत, तर सुमारे 8,200 धार्मिक स्वरूपाचे आहेत.
तसेच महापालिकेकडून मुंबईतील सर्व 24 महापालिका प्रभागांना सार्वजनिक जागांवर अनधिकृत प्रदर्शनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वपरवानगीशिवाय राजकीय होर्डिंग्ज लावू नयेत, अशा सूचना छापखाना चालकांना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, जाहिरातदारांना अधिक चांगल्या ट्रॅकिंग आणि अंमलबजावणीसाठी अधिकृत होर्डिंगवर QR कोड समाविष्ट करण्यास सांगितले आहे.
महापालिकेने (bmc) बेकायदेशीर होर्डिंगशी संबंधित तक्रारी हाताळण्यासाठी तक्रार अधिकारी नियुक्त केला आहे. तसेच बेकायदेशीर फलकांविरोधात नागरिक ‘आपलं सरकार पोर्टल’ किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरद्वारे तक्रारी नोंदवू शकतात.
गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली होती. ज्यात सर्व महापालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींना सार्वजनिक रस्ते, उद्याने आणि इतर जागांमधून बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्यासाठी सात ते दहा दिवसांची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.हेही वाचा
मुंबई, ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सुरू होणार
महाराष्ट्राच्या 29 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी