मुंबईतील प्रदूषण रोखण्यात पालिका हतबल

मुंबईतील (mumbai) हवामानाचा स्तर गेल्या काही दिवसापासून खालची पातळी गाठत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील (pollution) उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही.  गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकांच्या (BMC) प्रमुखांशी एक बैठक आयोजित केली होती. उपयायोजना करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील स्थिती आहे.  प्रदूषण थांबवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीनंतरचा (vidhan sabha elections) मुहूर्त मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना प्रदूषित वातावरणाचा त्रास सोसावा लागणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबईतील हवेचा स्तर बिघडत आहे.  दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीच्या हवेपेक्षाही वाईट झाला होता. त्यावेळी पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला होता. मात्र त्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करेपर्यंत एप्रिल महिना उजाडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी 2023 मध्येही पुन्हा एकदा हवेचा स्तर बिघडल्यामुळे दिवाळीपासूनच पालिकेने कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्याकरीता विभाग कार्यालयांमध्ये पथके स्थापन करण्यात आली होती. गेल्यावर्षी प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात (high court) गेला होता. न्यायालयाने फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावलीही तयार केली होती. तसेच या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकेही स्थापन केली होती. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीमुळे प्रदूषण उपाययोजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही. मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे प्रमाण जास्त असणे हे मूळ कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होते. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी विविध उपाययोजनाची नियमावली पालिका प्रशासनाने तयार केली होती.हेही वाचा पॅलिएटिव्ह केअरचा 2,00,000 हून अधिक रुग्णांना फायदा सिडकोच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

मुंबईतील प्रदूषण रोखण्यात पालिका हतबल

मुंबईतील (mumbai) हवामानाचा स्तर गेल्या काही दिवसापासून खालची पातळी गाठत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील (pollution) उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही. गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकांच्या (BMC) प्रमुखांशी एक बैठक आयोजित केली होती. उपयायोजना करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील स्थिती आहे.  प्रदूषण थांबवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीनंतरचा (vidhan sabha elections) मुहूर्त मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना प्रदूषित वातावरणाचा त्रास सोसावा लागणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबईतील हवेचा स्तर बिघडत आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीच्या हवेपेक्षाही वाईट झाला होता. त्यावेळी पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला होता. मात्र त्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करेपर्यंत एप्रिल महिना उजाडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी 2023 मध्येही पुन्हा एकदा हवेचा स्तर बिघडल्यामुळे दिवाळीपासूनच पालिकेने कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्याकरीता विभाग कार्यालयांमध्ये पथके स्थापन करण्यात आली होती. गेल्यावर्षी प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात (high court) गेला होता. न्यायालयाने फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावलीही तयार केली होती. तसेच या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकेही स्थापन केली होती. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीमुळे प्रदूषण उपाययोजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही. मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे प्रमाण जास्त असणे हे मूळ कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होते. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी विविध उपाययोजनाची नियमावली पालिका प्रशासनाने तयार केली होती. हेही वाचापॅलिएटिव्ह केअरचा 2,00,000 हून अधिक रुग्णांना फायदासिडकोच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

Go to Source