माहिम किल्ला परिसरात पर्यटक केंद्र विकसित करणार

माहिम फोर्टच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासोबतच या परिसराला 0Gateway of India प्रमाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मोठा आराखडा पालिका (BMC) तयार करत आहे. या योजनेत किल्ल्याभोवती सुमारे 500 मीटर परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 800 वर्षे जुना माहिम किल्ला समुद्रकिनाऱ्यालगत माहिम कोळीवाडा परिसरात स्थित आहे. किल्ल्याच्या आसपासचा मोठा परिसर विकसित करण्याची योजना असून त्यामध्ये महिम कोळीवाडा, माहिम पोलिस स्टेशन परिसर, माहिम बीच आणि तेथील सीफूड प्लाझा तसेच कलेक्टरच्या मालकीची शेजारील जागा (जिथे सध्या बांबू आणि फर्निचरची दुकाने आहेत) यांचा समावेश असेल. या जागेतील किती दुकाने अधिकृत आहेत याची माहिती घेण्यासाठी BMC ने मुंबई कलेक्टर कार्यालयाशी संपर्क साधला असून त्या भागाची पाहणी करण्याची विनंती केली आहे. 13व्या शतकात बांधलेला माहिम किल्ला Mahim Beach च्या दक्षिण टोकाला असून तो अरबी समुद्राकडे तोंड करून उभा आहे. सध्या पर्यटकांसाठी तो तात्पुरता बंद असला तरी महिम बीचमार्गे तसेच माहिम दर्गा जवळील स्वातंत्र्य सावरकर रोड (जुना कॅडेल रोड) मार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. महिम किल्ला पुनरुज्जीवन योजना माहिम किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी BMC आणि Customs Department of India यांच्यात एमओयू (MoU) करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. किल्ल्याचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी BMC सोबत Archaeological Survey of India (ASI) देखील काम करणार आहे. परिसर विकासाचे प्रस्तावित आराखडेकिल्ल्यावरील वॉचटॉवर पर्यटकांसाठी खुला करून तेथून Bandra–Worli Sea Link चे एरियल दृश्यबीच प्रोमेनेड विकसित करणेसीफूड प्लाझामुळे सांस्कृतिक पर्यटनाला चालनामाहिम चर्च आणि माहिम दर्गामुळे पर्यटन वाढवणेMahim Fort मुळे वारसा पर्यटन (हेरिटेज टुरिझम)G-नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी सांगितले की, हा प्रकल्प राबवण्यासाठी अनेक यंत्रणांचे समन्वय आवश्यक आहे. सीफूड प्लाझाजवळील दुकानांची स्थिती समजून घेण्यासाठी मुंबई कलेक्टरला पत्र पाठवण्यात आले आहे. सर्व संबंधित भागधारकांशी चर्चा करून माहिम किल्ल्याभोवती पर्यटन आणि विरंगुळ्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरासारखा एक व्यापक प्रेसींक्ट विकसित करण्याची योजना आहे.हेही वाचा Mumbai–Goa Highway: वर्षानुवर्षे काम रखडलेले, टोल नाके मात्र तयार

माहिम किल्ला परिसरात पर्यटक केंद्र विकसित करणार

माहिम फोर्टच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासोबतच या परिसराला 0Gateway of India प्रमाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मोठा आराखडा पालिका (BMC) तयार करत आहे. या योजनेत किल्ल्याभोवती सुमारे 500 मीटर परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे.सुमारे 800 वर्षे जुना माहिम किल्ला समुद्रकिनाऱ्यालगत माहिम कोळीवाडा परिसरात स्थित आहे. किल्ल्याच्या आसपासचा मोठा परिसर विकसित करण्याची योजना असून त्यामध्ये महिम कोळीवाडा, माहिम पोलिस स्टेशन परिसर, माहिम बीच आणि तेथील सीफूड प्लाझा तसेच कलेक्टरच्या मालकीची शेजारील जागा (जिथे सध्या बांबू आणि फर्निचरची दुकाने आहेत) यांचा समावेश असेल.या जागेतील किती दुकाने अधिकृत आहेत याची माहिती घेण्यासाठी BMC ने मुंबई कलेक्टर कार्यालयाशी संपर्क साधला असून त्या भागाची पाहणी करण्याची विनंती केली आहे.13व्या शतकात बांधलेला माहिम किल्ला Mahim Beach च्या दक्षिण टोकाला असून तो अरबी समुद्राकडे तोंड करून उभा आहे. सध्या पर्यटकांसाठी तो तात्पुरता बंद असला तरी महिम बीचमार्गे तसेच माहिम दर्गा जवळील स्वातंत्र्य सावरकर रोड (जुना कॅडेल रोड) मार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचता येते.महिम किल्ला पुनरुज्जीवन योजनामाहिम किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी BMC आणि Customs Department of India यांच्यात एमओयू (MoU) करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. किल्ल्याचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी BMC सोबत Archaeological Survey of India (ASI) देखील काम करणार आहे.परिसर विकासाचे प्रस्तावित आराखडेकिल्ल्यावरील वॉचटॉवर पर्यटकांसाठी खुला करून तेथून Bandra–Worli Sea Link चे एरियल दृश्यबीच प्रोमेनेड विकसित करणेसीफूड प्लाझामुळे सांस्कृतिक पर्यटनाला चालनामाहिम चर्च आणि माहिम दर्गामुळे पर्यटन वाढवणेMahim Fort मुळे वारसा पर्यटन (हेरिटेज टुरिझम)G-नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी सांगितले की, हा प्रकल्प राबवण्यासाठी अनेक यंत्रणांचे समन्वय आवश्यक आहे. सीफूड प्लाझाजवळील दुकानांची स्थिती समजून घेण्यासाठी मुंबई कलेक्टरला पत्र पाठवण्यात आले आहे. सर्व संबंधित भागधारकांशी चर्चा करून माहिम किल्ल्याभोवती पर्यटन आणि विरंगुळ्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरासारखा एक व्यापक प्रेसींक्ट विकसित करण्याची योजना आहे.हेही वाचाMumbai–Goa Highway: वर्षानुवर्षे काम रखडलेले, टोल नाके मात्र तयार

Go to Source