उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीची घोषणा

ठाकरेंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकीय. वर्तुळात अनेक नव्या समीकरणांची चर्चाही सुरू झाली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा या पक्षांच्या युतीची घोषणा करताना जागावाटपावर मात्र तिन्ही नेत्यांनी मौन बाळगलं.  राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासहा राज ठाकरेंनी व्यक्त केला.  मुंबईसह सात नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष एकत्रित लढणार आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुंबईची लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी दुपारी 12 वाजता एकत्र येऊन युतीची घोषणा केली.  राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, असं भाजपाचे नेते रावसाहेब दानवे म्हणाले होते. रावसाहेब दानवेंच्या या विधानावरुन पत्रकाराने उद्धव ठाकरेंना विचारले. यावर त्यांना उत्तर द्यायला, ते त्या पातळीचे नाहीय. त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. यानंतर बाजूला बसलेल्या राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला आणि मला वाटतं उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत, असं म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.  मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उधावर्ती लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे पाहायला मिळताय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Go to Source