मुंबई महापालिका निवडणुक 2026 ची तारीख जाहीर
बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची (bmc elections) तारीख जाहीर करण्यात आली आहे.मुंबई (mumbai) ठाण्यासह (thane) राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल जानेवारी रोजी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील (maharashtra) 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात (date announce) आला.227 जागांसाठी शेवटचे मतदान फेब्रुवारी 2017 मध्ये झाले होते. मुंबई व्यतिरिक्त पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिकसह 28 महानगरपालिकांच्या तारखाही जाहीर केल्या.29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला होईल. मतदान 15 जानेवारी होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल.महानगरपालिकांची यादी:1. बृहन्मुंबई – 2272. भिवंडी-निजामपूर – 903. नागपूर – 1514. पुणे – 1625. ठाणे – 1316. अहमदनगर – 687. नाशिक – 1228. पिंपरी-चिंचवड – 1289. औरंगाबाद – 11310. वसई-विरार – 11511. कल्याण-डोंबिवली – 12212. नवी मुंबई – 11113. अकोला – 8014. अमरावती – 8715. लातूर – 7016. नांदेड-वाघाळा – 8117. मीरा-भाईंदर – 9618. उल्हासनगर – 7819. चंद्रपूर – 6620. धुळे – 7421. जळगाव – 7522. मालेगाव – 8423. कोल्हापूर – 9224. सांगली-मिरज-कुपवाड – 7825. सोलापूर – 11326. इचलकरंजी – 7627. जालना – 6528. पनवेल – 7829. परभणी – 65
Home महत्वाची बातमी मुंबई महापालिका निवडणुक 2026 ची तारीख जाहीर
मुंबई महापालिका निवडणुक 2026 ची तारीख जाहीर
बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची (bmc elections) तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई (mumbai) ठाण्यासह (thane) राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल जानेवारी रोजी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील (maharashtra) 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या.
आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात (date announce) आला.
227 जागांसाठी शेवटचे मतदान फेब्रुवारी 2017 मध्ये झाले होते. मुंबई व्यतिरिक्त पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिकसह 28 महानगरपालिकांच्या तारखाही जाहीर केल्या.
29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे.
या नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 अशी असणार आहे.
तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला होईल. मतदान 15 जानेवारी होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल.
महानगरपालिकांची यादी:
1. बृहन्मुंबई – 227
2. भिवंडी-निजामपूर – 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे – 131
6. अहमदनगर – 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड – 128
9. औरंगाबाद – 113
10. वसई-विरार – 115
11. कल्याण-डोंबिवली – 122
12. नवी मुंबई – 111
13. अकोला – 80
14. अमरावती – 87
15. लातूर – 70
16. नांदेड-वाघाळा – 81
17. मीरा-भाईंदर – 96
18. उल्हासनगर – 78
19. चंद्रपूर – 66
20. धुळे – 74
21. जळगाव – 75
22. मालेगाव – 84
23. कोल्हापूर – 92
24. सांगली-मिरज-कुपवाड – 78
25. सोलापूर – 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना – 65
28. पनवेल – 78
29. परभणी – 65
