चर्चगेटमध्ये बेकायदेशीर विक्रेत्यांवर पालिकेची धडक कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) चर्चगेटमधील (churchgate) जे टाटा रोडवर बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर (vendor) कारवाई केली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या या भागांना “खाऊ गल्ली” असे संबोधले जाते. हे विक्रेते परवानगीशिवाय अनधिकृतरित्या इथे स्टॉल्स लावतात.बुधवार आणि गुरुवारी पालिकेच्या (bmc) अधिकाऱ्यांनी परिसरातील बेकायदेशीर फूड स्टॉल्स (food stall) आणि फेरीवाल्यांची उपकरणे आणि सामान जप्त केलं. यामध्ये गॅस कुकर आणि इतर वस्तूंचा समावेश होता.या कारवाईनंतरही लवकरच अनेक स्टॉल पुन्हा सुरू झाले. वृत्तानुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत अनेक विक्रेते परतले होते. पालिका कर्मचारी सलग दोन दिवस त्यांना टार्गेट करत होते. स्ट साधनांच्या जप्तीमुळे अनेक स्टॉल्स बंद करण्यास भाग पाडले गेले.काही विक्रेत्यांनी उपकरणे आणि शेडविनाच आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, बंद स्टॉल्सच्या मागे टाकलेले टेबल आणि इतर वस्तू फूटपाथवर अजूनही अडथळा ठरत आहे. विक्रेते आता पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या जप्त केलेल्या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.खाऊ गल्ली (khau galli) हा मुंबईच्या पाक संस्कृतीचा एक निश्चित भाग आहे. वाजवी दरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलने भरलेल्या लहान गल्ल्या खवय्यांसाठी पर्वणी आहेत. मुंबईत अनेक खाऊ गल्ली आहेत, जसे की घाटकोपर खाऊ गली, कार्टर रोड खाऊ गली, सीएसएमटी खाऊ गली इ.हेही वाचामुंबई: बोरिवलीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’31 डिसेंबरच्या रात्री लोकल उशीरापर्यंत धावणार, जाणून घ्या टाईमटेबल
Home महत्वाची बातमी चर्चगेटमध्ये बेकायदेशीर विक्रेत्यांवर पालिकेची धडक कारवाई
चर्चगेटमध्ये बेकायदेशीर विक्रेत्यांवर पालिकेची धडक कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) चर्चगेटमधील (churchgate) जे टाटा रोडवर बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर (vendor) कारवाई केली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या या भागांना “खाऊ गल्ली” असे संबोधले जाते. हे विक्रेते परवानगीशिवाय अनधिकृतरित्या इथे स्टॉल्स लावतात.
बुधवार आणि गुरुवारी पालिकेच्या (bmc) अधिकाऱ्यांनी परिसरातील बेकायदेशीर फूड स्टॉल्स (food stall) आणि फेरीवाल्यांची उपकरणे आणि सामान जप्त केलं. यामध्ये गॅस कुकर आणि इतर वस्तूंचा समावेश होता.
या कारवाईनंतरही लवकरच अनेक स्टॉल पुन्हा सुरू झाले. वृत्तानुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत अनेक विक्रेते परतले होते. पालिका कर्मचारी सलग दोन दिवस त्यांना टार्गेट करत होते. स्ट साधनांच्या जप्तीमुळे अनेक स्टॉल्स बंद करण्यास भाग पाडले गेले.
काही विक्रेत्यांनी उपकरणे आणि शेडविनाच आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, बंद स्टॉल्सच्या मागे टाकलेले टेबल आणि इतर वस्तू फूटपाथवर अजूनही अडथळा ठरत आहे. विक्रेते आता पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या जप्त केलेल्या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
खाऊ गल्ली (khau galli) हा मुंबईच्या पाक संस्कृतीचा एक निश्चित भाग आहे. वाजवी दरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलने भरलेल्या लहान गल्ल्या खवय्यांसाठी पर्वणी आहेत. मुंबईत अनेक खाऊ गल्ली आहेत, जसे की घाटकोपर खाऊ गली, कार्टर रोड खाऊ गली, सीएसएमटी खाऊ गली इ.हेही वाचा
मुंबई: बोरिवलीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’
31 डिसेंबरच्या रात्री लोकल उशीरापर्यंत धावणार, जाणून घ्या टाईमटेबल